शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:40 IST

रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करुन पळणाºया महंमद शेख (२५, रा. मुंब्रा) याला नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांनी केली अटक ६५ हजारांचे चार मोबाईल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करुन पळणाºया महंमद शेख (२५, रा. मुंब्रा) याला नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून मोटारसायकलसह ६५ हजारांचे चार मोबाईल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवी मुंबईतील घणसोली येथील रहिवाशी सर्वेश सकपाळ हे त्यांचे मित्र श्रीधर शेवाळे यांच्यासह ठाण्यातील नितीन कंपनी येथून ठाणे रेल्वे स्थानक येथे २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रिक्षाने जात होते. ते ठाणे महापालिका सर्कलजवळ आले असता, त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या हातातील १५ हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. हा आरडाओरडा ऐकून काही नागरिकांनी पाठलाग करुन त्यांच्यापैकी मोटारसायकल चालविणाºया महंमद शेख याला पकडले. नंतर त्याठिकाणी आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. या धुमश्चक्रीत त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला २१ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी राऊत यांनी अटक केली. सखोल चौकशीत त्याने मुलूंड आणि कळवा भागातून चोरलेले अन्य तीन मोबाईलसह ६५ हजारांचे चार मोबाईल हस्तगत केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी