शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेच्या कोविड केअर आणि अलगीकरण कक्षात नागरिकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:14 IST

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता भाईंदरच्या क्रिडा संकुला जवळील इमारतीं मध्ये अलगीकरण केंद्र सुरु केले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहुन लक्षणं नसलेल्यांसाठी रामदेव पार्क जवळील इमारतीत कोविड केअर सुरु करण्यात आले.

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ आणि गैरकारभाराची लक्तरे खुद्द कोविड केअर व अलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकां कडुनच नियमीतपणो वेशीवर टांगली जात आहेत. निकृष्ट जेवण व नाश्ता आणि तो देखील वेळेवर न मिळणो, पिण्यास व आंघोळीस गरम पाणी नाही, साफसफाई नाही यातुनच लहानु मुलांचे व वृध्दांचे होणारे अतोनात हाल यावरुन लोकं संतप्त होऊन खाली उतरुन हल्लाबोल करत आहेत. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला घरी सोडा, वाटल्यास घरा बाहेर टाळे मारुन आम्हाला आत ठेवा चालेल असा उद्वेग लोकांचा चालला आहे. त्यामुळे एरव्ही करदात्या जनतेची उधळपट्टी करणारे नगरसेवक, राजकारणी आणि अधिकारी जनतेच्या तोंडाला मात्र पाने पुसत असल्याचे निषेध व्यक्त होत आहे.मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता भाईंदरच्या क्रिडा संकुला जवळील इमारतीं मध्ये अलगीकरण केंद्र सुरु केले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहुन लक्षणं नसलेल्यांसाठी रामदेव पार्क जवळील इमारतीत कोविड केअर सुरु करण्यात आले. अलगीकरण केंद्रात कोरोना नसलेले पण संशयीत तर कोविड केअर मध्ये कोरोना रुग्णांना पालिका ठेवत आहे. महापालिकेने सदर दोन्ही ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना नाश्ता, चहा व जेवण पुरवण्यासाठी ठेकेदार नेमला आहे.परंतु सदर जेवणा बाबत मोठय़ा संख्येने लोकांच्या तक्रारी असुन कच्च्या चपात्या, बेचव जेवण, कधी आंबुस तर कधी भातात अळ्या वा केस सापडणे या सारख्या लोकांच्या तक्रारी आहेत. नाश्ता बद्दल देखील तक्रारी असुन जेवण - नाश्ता वेळेत मिळत नाही जेणे करुन अन्य आजाराची औषधे घेणारे वा ज्येष्ठांचे हाल होत आहेत. लहान मुलं तर सोडा मोठे देखील कसेबसे जेवण जेवतात.गरम पाणी पिण्यास वेळेवर मिळत नाही. उन्हाळा होता तेव्हा ठिक होते पण पावसाळा सुरु झाल्याने थंड पाण्याने आंघोळ लहानु मुलं - मोठय़ांनी कशी करायची ? असा प्रश्न लोकं करत आहेत. थंडपाण्याने  आंघोळ केल्याने ताप, सर्दी आदी आजार होण्याची भिती वाटत आहे. पालिकेने येथे साफसफाईसाठी देखील ठेका दिला असला तरी स्वच्छतेची बोंबच आहे. सफाई नियमीत नसल्याने घाणीत रहावे लागत असुन महिलांनी तर आम्हालाच फिनाईल, झाडु आदी द्या आम्हीच खोली साफ करु असे प्रशासनास सुनावले.  पालिका कोरोना रुग्ण व संशयीतांना अलगीकरणात ठेवण्यासाठी आणते पण निदान चांगले जेवण, नाश्ता , दूध वेळेवर नाही. स्वच्छता सफाई नाही ? मग आम्हाला आणताच कशाला असा संताप लोकांनी बोलुन दाखवला. आम्ही घरी राहु , इकडे राहिलो तर आजारी पडुन मरुन जाऊ असे वाटायला लागल्याचे लोकांनी सांगीतले. लोकं नेहमीच खाली उतरुन संताप व्यक्त करत असुन यातुन गोंधळ होऊन सोशल डिस्टंसिंग देखील राहिलेले नाही.नगरसेवक, राजकारणी व अधिकारी महापालिकेतील स्वता:च्या आलिशान दालनं, खान-पान , कार्यक्रम व पर्यटन दौरायांवर जनतेच्या पैशांतुन उधळपट्टी करतात. त्यासाठी त्यांना जेवण चमचमीत दर्जेदार व सर्व सुविधा पंचतारांकित लागतात पण येथे शहरातील कोरोना ग्रस्त नागरिकांच्या माथी मात्र निकृष्ट आणि गैरसोयीचा डोंगर मारला आहे. टेंडर आणि अवास्तव कामांसाठी पैशांची समिकरणे जुळवले जातात पण नागरिकांच्या वैद्यकिय सुविधेसाठी देखील यांची वाटमारी चालते असा संताप लोकांनी बोलुन दाखवला. नगरसेवक, नेते व अधिकारायांनी देखील पालिकेच्या कोविड केअर आणि अलगीकरण कक्षात राहुन दाखवावे असे आवाहन नागरिकां मधुन केले जात आहे.