शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधील घातक रसायन रस्त्यावर पडल्याने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:47 IST

अंबरनाथ : टँकरमधील घातक रसायन रस्त्यावर पडल्याने कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरून जाणा-या वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

अंबरनाथ : टँकरमधील घातक रसायन रस्त्यावर पडल्याने कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरून जाणा-या वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहन चालकांना उग्र वासाचा आणि डोळे चुरचुरण्याचा त्रास सहन करावा लागला. सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली असून, अगिशमन दलाने रस्त्यावर पाणी मारल्यावर तो त्रास कमी झाला. उल्हासनगरहून बदलापूरच्या दिशेने जाणा-या एका रसायनाने भरलेल्या टँकरला गळती लागल्याने त्या टँकरमधील घातक रसायन उल्हासनगरच्या साईबाबा मंदिर ते अंबरनाथ पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर पडले होते. सुरुवातीला कोणालाच त्याची कल्पना आली नाही. मात्र काही वेळेतच रस्त्यावर उग्र वास आणि नागरिकांचे डोळे चुरचुरण्यास सुरुवात झाली.काही नागरिकांनी त्याची कल्पना लागतच असलेल्या अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांना दिली. कर्मचा-यांनी काही काळातच या रस्त्यावर पाणी मारून रसायनीची घातकता कमी केली. अवघ्या 15 मिनिटांतच नागरिकांना होणारा त्रास कमी झाल्यावर पोलिसांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेनंतर लागलीच पोलिसांनी त्या टँकरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच रस्त्यावर पडलेले रसायन काय होते याचा देखील तपास करीत आहेत. या टँकरने हे घातक रसायन कोणत्या कंपनीमधुन उचलले होते याचा देखील तपास पोलीस करित आहे. या प्रकारामुळे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अंबरनाथ परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.