शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहरे महापालिका नव्हे बिल्डर लॉबी चालवते; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:11 IST

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणे गरजेचे असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ज्या सोयीसुविधा महापालिकेने देणे अपेक्षित असते, त्या सुविधा विकासक देतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे शहर हे महापालिका नाही तर बिल्डर लॉबी चालवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज यांनी शहरातील वाहतूक समस्या ते पॅनल पध्दतीने होत असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा केली. मुळात पॅनल पध्दतीने निवडणुका ही काही राजकीय पक्षांची सोय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप यांनी ही पॅनल पध्दतीने निवडणुका घेण्याचे का ठरवले हा प्रश्न आहे. यापूर्वी निवडणुका होत नव्हत्या का, असा प्रश्न त्यांनी केला. या पॅनल पध्दतीत एकाच पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच एकमत नसते. मग नागरिकांच्या समस्या कशा सुटतील असेही ते म्हणाले. परंतु केवळ आपल्या फायद्यासाठी ही पॅनल पध्दती आणली गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाहतूक समस्या सोडवायची असेल तर... वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठोस नियमावली हवी. एका व्यक्तीकडे किती वाहने हवी यालाही मर्यादा हव्यात, मुळात आपल्या येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सवय लागणे गरजेचे आहे.  मेट्रोसारखे प्रकल्प तरच यशस्वी होऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे ज्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. त्या सुविधा बिल्डर पुरवितात.  त्यामुळे शहरे ही महापालिका नव्हे तर बिल्डर चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.  शहर सुधारायचे असेल तर त्यासाठी काय पर्याय असू शकतो, असा सवाल त्यांना केला व लागलीच मीच शहर सुधारू शकतो, असे उत्तर दिले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे