- नारायण जाधव ठाणे : सिडकोच्या विद्युत विभागाने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. नवी मुंबई विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात सिडकोने अलीकडेच काढलेल्या २५० कोटींच्या कामांत गैरव्यवहार झाला असून काही विशिष्ट ठेकेदारांना लाभ व्हावा म्हणून त्यांच्या फायद्याच्या अटी व शर्ती निविदेत टाकल्याच्या तक्रारी काही खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केल्या होत्या. त्यांची दखल घेऊन पीएमओने राज्याच्या ऊर्जामंत्र्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्रयस्थ समितीकडून एका महिन्याच्या आत ही निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.विमानतळ क्षेत्रात अलीकडे काढलेली सुमारे २५० कोटींची कामेच नव्हे तर गेल्या दहा वर्षांत सिडकोच्या विद्युत विभागाने केलेल्या सर्व कामांची चौकशी लावली आहे.यामुळे सिडकोतील शेकडो कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोच्या विद्युत विभागात २००८ पासून सुरू असलेल्या अनागोंदीची तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तत्कालीन दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे यांना चौकशी करायला सांगितले होते. सरवदे यांनी प्राप्त झालेल्या चार प्रकरणांची चौकशी करून सिडकोचे अधीक्षक अभियंता विद्युत, कार्यकारी अभियंता विद्युत १ व २ यांच्यावर गुन्हा दाखल करून खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकंना २०१५-१६ मध्ये केली होती. मात्र, ही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. अशातच विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात सुरू असलेल्या २५० कोटींच्या कामांच्या अनागोंदीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडेच खासदार प्रतापराव जाधव आणि कृपाल तुमाने यांच्यासह इतरांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता थेट पंतप्रधान कार्यालयानेच सिडकोच्या विद्युत विभागातील अनागोंदीची दखल घेतल्याने संबधित अधिकाºयांची धाबे दणाणले आहे.अशी होणार चौकशीसिडकोमार्फत मागील दहा वर्षांत करण्यात आलेल्या विद्युत कामांच्या गुणवत्तेबाबत त्रयस्थ समितीकडून परीक्षण करून एका महिन्याच्या आत त्याचा अहवाल सादर करायचाआहे.या त्रयस्थ समितीमध्ये निवृत्त विद्युत निरीक्षक, महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांचा समावेश असणार आहे.>प्रज्ञा सरवदे समितीनेही ठेवला होता ठपकानेरूळमधील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक समीर बागवान यांच्या तक्रारीवरून नेमलेल्या तत्कालीन दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे यांची चौकशी समितीने आपल्या अहवालात एकाच कामाचे चार तुकडे करु न ते ए-२ फॉर्मवर विशिष्ठ ठेकेदारांना दिल्याचा आरोप विद्युत विभागावर ठेवला होता.यात नवीन पनवेल सेक्टर १० येथील भूखंड क्र . १६१, १६१अ, ११९, ९८ व ८९ येथे पथदिवे लावण्याचे १८.३६ लाखांचे काम तुकडे करु न अधीक्षक अभियंत्यांनी दिले . तसेच बीपीटी कॉम्प्लेक्स दिघाटी, हेटवणे येथे सौरऊर्जेवर दिवाबत्तीचे कामही ई-निविदा न मागवता मर्जीतील कंत्राटदारांना दिली आहेत.कामे देतांना विशिष्ट ब्रॅड्स व कंपन्यांनाच सवलत देऊन त्यांचेचे मटेरिअल घेण्याची अट निविदेत घातल्याचा आरोप आहे. शिवाय सिडकोकडे नोंदणी नसलेल्या मे. स्टर्लिंग विल्सन इलेक्ट्रिकल्स, अनिता इलेक्ट्रिकल्स व मे.रोशन इलेक्ट्रिकल्स यांचा या यादीत नियमबाह्य समावेश आहे.सिडकोकडे २६ कंत्राटदार ‘अ’ वर्गात नोंदणी असताना विशिष्ट १० कंपन्यांना प्रोत्साहन दिल्याचे या अहवालात नमूद आहे. चौथ्या आरोपात सरवदे यांनी अधीक्षक अभियंत्यांनी ९७.८९ लाख रु पये नियमबाह्यपणे खर्च करणे, सर्व समावेशक देखभाल दुरु स्तीचे काम मे. ए. एस. इलेक्ट्रिकल्स कॉर्पोरेशनला २०१० ते २०१४ कालावधीसाठी प्रतिवर्षी २३ लाख रु पयांना दिले असतानाही त्याच कंपनीला पुन्हा मटेरिअल पुरवण्यासाठी ए-२ फॉर्मवर ९७.७० लाखांची कामे त्याच कालावधीसाठी दिल्याने सिडकोचे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले.>गैरव्यवहार रडावरसिडकोकडून नवी मुंबईत विमानतळ क्षेत्रात बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन क्षेत्रात सुमारे ८० कोटींची दोन आणि ९३ कोटींचे एक अशी तीन कामे सुरू आहेत. सिडकोच्या विद्युत विभागातील अधिकाºयांनी त्यांच्या कंत्राटाच्या निविदेत काही विशिष्ट अटी आणि शर्ती टाकल्या होत्या. याबाबतच्या तक्रारी पंतप्रधान कार्यालयाने उर्जामंत्र्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्या होत्या. पंतप्रधान कार्यालयाने दोन-तीनदा स्मरणपत्रे दिल्यावर त्याचे गांभीर्य ओळखून ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वरिष्ठांची बैठक घेऊन सिडकोच्या विद्युत विभागातील अनागोंदीबाबत संबंधितांची खरडपट्टी काढली.
सिडकोच्या विद्युत विभागातील शेकडो कोटींच्या गैरव्यवहारांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 05:43 IST