शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर दगडफेक करणाऱ्या गुंडाला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:50 IST

जमावाने पकडले : पोलिसांनी केली अटक

ठाणे : महागिरी कोळीवाडा येथील रहिवाशांना शिवीगाळ करून गोंधळ घालणाºया मुझम्मील सिकंदर मेमन (२३, रा. महागिरी, ठाणे) या सराईत गुंडाला रोखणारे पोलीस कॉन्स्टेबल वसंत मंडळ (३२) यांच्यावरच दगड भिरकावल्याने संतापलेल्या जमावाच्या एका गटाने त्याला बेदम चोप दिल्याची घटना घडली. जमावानेच त्याला त्याला ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आरोपीला पोलिसांनीअटक केली असून ठाणे न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंडळ यांची १३ जून रोजी महागिरी कोळीवाडा भागात पेट्रोलिंग सुरु होती. त्याचवेळी महागिरी भागात एक व्यक्ती गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातून दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्याठिकाणी सराईत गुन्हेगार मेमन याने आरडाओरडा करुन गोंधळ घातला होता.काही लोकांवर त्याने दगडही भिरकावले होते. त्याला शांत राहण्याचे मंडळ यांनी आवाहन केले. त्यावेळी त्याने शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्कीही केली. त्यानंतर त्यांच्यावरही त्याने दगड भिरकावला. मंडळ यांनी तातडीने पोलिसांची जादा कुमक बोलविली. त्याच दरम्यान त्याने तंबाखू विक्रेते शब्बीर मेमन यांच्या दुकानात शिरुन त्यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यामुळे संतापलेल्या जमावाने त्याला चांगलीच मारहाण केली. यात त्याच्या तोंडाला, हाताला आणि नाकाला जबर मार लागल्याने तो मारहाणीत जखमी झाला आहे.जमावानेच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलीस आणि इतर रहिवाशांना धक्काबुक्की करणे आणि दगड मारणे आदी कलमांखाली त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस