शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने , साडेचार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:52 AM

ख्रिस्तीबांधवांच्या ख्रिसमस सणास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने खमंग पदार्थांनी शहरातील बेकरी सजल्या आहेत. यात विविध प्रकारांचे केक, मिठाई आणि इतर गोड पदार्थ तयार केले जात आहे

ठाणे : ख्रिस्तीबांधवांच्या ख्रिसमस सणास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने खमंग पदार्थांनी शहरातील बेकरी सजल्या आहेत. यात विविध प्रकारांचे केक, मिठाई आणि इतर गोड पदार्थ तयार केले जात आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातही बंदींनी या सणानिमित्त गोड पदार्थ बनवले आहेत. हे पदार्थ ठाणे मध्यवर्ती कारागृहासह इतर नऊ ठिकाणी पाठवण्यात आले असून यातून कारागृहाच्या बेकरी विभागाने चार लाख ७७ हजार ३७४ इतके उत्पन्न मिळवून दिले आहे.बंदींच्या हातांना काम देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती विभागात कारखाना विभाग सुरू आहे. यात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी काम सुरू असते. बेड, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, बिस्किटे, फरसाण, कापड बनवणे यासारख्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ या कारखाना विभागात बंदी बनवत असतात. विशेषत: दिवाळी-नाताळनिमित्त या बेकरी विभागात विविध फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या बेकरी विभागात नाताळचे औचित्य साधून कप केक, स्पंज केक, साधे पाव तयार करण्यात आले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ठाणे कारागृहातील १५ बंदी या कामात गुंतले होते. कारागृह आणि संस्थांनी मागणीनुसार त्यात्या ठिकाणी हे पदार्थ पाठवले आहेत. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तळोजा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह (आधारवाडी जेल), ठाणे मध्यवर्ती कारागृह, सेंटर फॉर पीस ट्रस्ट प्रिझन मिनिस्ट्री इंडिया, सीड आॅफ होम चॅरिटेबल ट्रस्ट, प्लेवीन संतारिटा प्रिझन मिनिस्ट्री इंडिया- गोरेगाव, संजीवनी फाउंडेशन सामाजिक प्रगती केंद्र, लुईस कम्युनिटी सेंटर - कल्याण येथून या पदार्थांना मागणी आली होती. यात कप केकला मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तर स्पंज केकला भायखळा जिल्हा कारागृह या ठिकाणाहून अधिक मागणी आली. २५,१३६ नग केक कपातून एक लाख ८४ हजार ७५० रुपये, १६ लाख सहा हजार ५०० किलो स्पंज केकमधून दोन लाख ५३ हजार २४ रुपये, तर ९९०० नग साध्या पावांमधून ३९ हजार ६०० रुपये उत्पन्न मिळाले.