शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘चिखलोली’साठी खाजगी जागेचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:36 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्यादरम्यान चिखलोली स्टेशन होणार, या आशेवर शहरातील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतीमधील अनेक फ्लॅटची विक्री केली.

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्यादरम्यान चिखलोली स्टेशन होणार, या आशेवर शहरातील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतीमधील अनेक फ्लॅटची विक्री केली. गेल्या १८ ते २० वर्षांपासून सुरु असलेल्या या पाठपुराव्याला अखेर २०१९ मध्ये यश आले. चिखलोली स्थानकाच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी देत त्याचे भूमिपूजनही केले आहे. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाल्याने आता स्थानक होणार याची खात्री नागरिकांना मिळाली आली आहे; मात्र रेल्वे स्थानकाची नेमकी जागा कोणती याबत अजुनही संभ्रम आहे. चिखलोली गावासमोरच रेल्वे स्थानक उभारण्याचा निर्णय होण्याची शक्यता असून, त्यासाठी रेल्वे प्रशासन खाजगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करणार आहे. जागेचा प्रश्न सुटल्यावरच खऱ्या अर्थाने चिखलोली रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरुवात होईल.अनेक धुळ खात पडलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने रेल्वे स्थानकाच्या कामाचा अडथळा दूर झाला आहे. स्थानक कुठे उभारले जाणार, याबाबत स्पष्टता नसली, तरी चिखलोली गावाच्यासमोरील हद्दीतच रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे; मात्र ज्या ठिकाणी स्थानकाचा प्रस्ताव आहे, त्या ठिकाणी सरकारी किंवा रेल्वेची स्वत:ची कोणतीच जागा नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला स्थानकासाठी खाजगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे. डी मार्टच्या मागच्या बाजुला ही जागा असून, रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळाल्याने आता खाजगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे.- संबंधित वृत्त/२>डी मार्टच्या मागच्या बाजूला स्थानक झाल्यास चिखलोली हे स्थानकापासूनचे जवळचे गाव होणार आहे. पूर्व भागात चिखलोली गाव आणि पश्चिम भागात गॅरलीक कंपनीची जागा असल्याने त्यांना या प्रकल्पासाठी जागा द्यावी लागणार आहे; मात्र दुसरी जागा निवडण्याबाबत अजून कोणता निर्णय झालेला नाही.स्थानकाला मंजुरी मिळालेली असून, त्यासाठी प्राथमिक टप्प्यात १२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील ११७ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे; मात्र भूसंपादनाची प्रक्रिया करावी लागल्यास जास्त निधी लागणार आहे.