शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गट तयार करणार चॉकलेट, लेदर बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:54 IST

टीडीसी देणार प्रशिक्षण : महिलांच्या प्रगतीसाठी पाऊल

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) १५ हजार ३१० कोटी ढोबळ नफ्यासह तीन हजार २०० कोटीनिव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षात कमावला आहे. अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीशील व विविध पुरस्कार प्राप्त नऊ महिला बचतगटांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक पाठबळाच्या साहायाने त्यांच्या प्रगतीचीदेखील घोडदौड सुरू केली आहे. व्यवसायिक प्रगतीसाठी नामवंत व विविध पुरस्कार प्राप्त डोंबिवलीतील दोन बचत गट, वसईतील सहा आणि ठाणे येथील एक अशा नऊ बचत गटांचे टीडीसीसी बँकेने दायित्व स्वीकारून त्यांच्या व्यवसायिक सक्षमतेसाठी त्यांना प्रशिक्षणाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे.वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणारज्वेलरी बनवण्यासह युको चॉकलेट, होम डेकोरेट, कापडी पिशव्या, लेदर बॅग, ब्युटी पार्लर आदी विविध प्रशिक्षण स्वखर्चाने या महिला बचत गटांना प्रायोगिक तत्वावर देऊन त्यांनी उत्पादीत वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांची व्यवसायिक प्रगती साधण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत उपक्रम हाती घेऊन प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे सुतोवाच टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.या बचत गटांच्या व्यवसायिक प्रशिक्षणानंतर त्यांच्या कामकाजासह त्यांनी तयार केलेल्या उत्पादकासाठी खास औद्योगिक क्षेत्रासह कॉर्पोरेट कंपन्यांशीदेखील चर्चा करण्याचे नियोजन आहे.एक लाख तीन ४१५ कोटींचा निधी : बँकेने सततच्या वैधानिक व नाबार्ड तपासणीमध्ये अ वर्ग प्राप्त केला आहे. याशिवाय बँकेचे वसूल भाग भांडवल मार्च अखेर चार हजार ३०३ कोटींचे असून एक लाख तीन हजार ४१५ कोटींचा एकूण निधी बँकेकडे आहे. तर स्वनिधी ९३ हजार ३३० कोटींचा आहे. बँकेकडे सहा लाख ९७ हजार ८१५ कोटींच्या ठेवी आहेत. कर्जवितरण तीन लाख एक हजार ३२७ कोटींचे आहे. खेळते भांडवल आठ लाख ३१ हजार ४३३ कोटींचे असल्याचेही पाटील यांनी लोकमतला सांगितले.

 

 

टॅग्स :thaneठाणे