शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार 

By अजित मांडके | Updated: February 21, 2023 16:59 IST

मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

ठाणे : प्रशासकीय सेवेतील दर्जेदार अधिकारी घडवणाऱ्या ठाण्याच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत एमपीएससी मार्गदर्शनपर वर्ग सुरु करण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची मनविसे शिष्टमंडळाने भेट घेत ही मागणी केली होती. तसेच ठाणे शहराबाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे यूपीएससी अभ्यासक्रमासोबत एमपीएससीकरिता प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे येत्या काळात सीडी देशमुख संस्थेत एमपीएससी मार्गदर्शनाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा देशभरात नावलौकिक आहे. या संस्थेतून प्राविण्य मिळवत अनेक अधिकाऱ्यांनी देशभरातील विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. आजमितीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या संस्थेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शनपर वर्ग सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयाकरिता ठाणे पालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. याप्रश्नी अंतिम निर्णय झाल्यास कळवण्यात येईल असेही पाचंगे यांना पत्राद्वारे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी कळवले आहे.

खासदारांशी सकारात्मक चर्चामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन दिल्यानंतर याप्रश्नी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी चर्चा केली. खासदार शिंदे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ आयुक्तांना दूरध्वनी द्वारे लवकरात लवकर कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून देण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMPSC examएमपीएससी परीक्षा