शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात झाड पडून चिमुरडी जखमी, प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:25 IST

सावरकरनगर येथील एका घरावर धोकादायक नारळाचे झाड पडून रविवारी सकाळी दिव्यांशी यादव ही पाचवर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सावरकरनगर येथील एका घरावर धोकादायक नारळाचे झाड पडून रविवारी सकाळी दिव्यांशी यादव ही पाचवर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली. झाडाचा काही भाग चिमुरडीच्या पोटावर आदळल्याने तिला अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे तातडीने तिला मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील सावरकरनगर येथील अष्टविनायक सोसायटी येथील रूम नंबर ६ मध्ये राहणारे शिवलाल यादव यांच्या घरावर रविवारी सकाळी अचानक नारळाचे झाडे कोसळले. हे झाड पडले तेव्हा त्यांची मुले घरात झोपली होती. याच दरम्यान, पडलेल्या झाडाचा काही भाग चिमुरडी दिव्यांशीच्या पोटावर पडला. तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान तिला अंतर्गत रक्तस्राव होत असल्याची बाब पुढे आली. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने मुंबईला हलवले. तिथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षाच्या सूत्रांनी दिली.सावरकरनगर येथे पडलेले नारळाचे झाड, हे धोकादायक झाले होते. असे तेथील स्थानिकांनी सांगितले. त्याबाबत, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागात तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

टॅग्स :newsबातम्याthaneठाणे