शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

हलगर्जीपणामुळे गर्भातच बाळाचा मृत्यू; रक्मिणीबाई रुग्णालयाच्या महिलेला ठेवले ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:47 IST

प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर तातडीने उपचार करण्याऐवजी तिला डॉक्टर नसल्याचे कारण देत ताटकळत ठेवण्यात आले. पाच तासांनंतर महिला प्रसूत झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ दगावले.

कल्याण : प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर तातडीने उपचार करण्याऐवजी तिला डॉक्टर नसल्याचे कारण देत ताटकळत ठेवण्यात आले. पाच तासांनंतर महिला प्रसूत झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ दगावले. ही घटना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात घडली आहे. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीप्रकरणी तक्रार देण्यासाठी तिच्या पतीने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस तक्रार घेत नसल्याचे पतीने सांगितले.वर्षा ढगे (रा. टिटवाळा) या रक्मिणीबाई रुग्णालयातील डॉ. रुची उपाध्याय यांच्याकडे चार महिन्यांपासून उपचार घेत होत्या. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वर्षा यांना प्रसूतिवेदना सुरू झाल्या. त्यामुळे पती रवी यांंनी त्यांना उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात ५.४५ वाजता दाखल केले. मात्र, वर्षा यांच्या पायात पाणी झाल्याने, त्यांच्या प्रसूतीसाठी रुग्णालयातील कर्मचाºयांनी नकार दिला. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. वर्षा यांना रक्तस्राव होत असतानाही कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगूनही दाद देत नव्हते. दुपारी १२.३० पर्यंत त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. बाळाचे डोके वर्षा यांच्या मांडीला लागत असल्याचे सांगितले असता, कर्मचाºयांनीच ‘तुम्हाला जास्त कळते की आम्हाला’, असे सांगून वर्षा यांना गप्प केले.दुपारी एक वाजून ८ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला, परंतु ते मृत जन्माला आल्याचे सांगण्यात आले. बाळाचा मृत्यू १२ वाजून ३० मिनिटांनी झाल्याचे सांगितले. मात्र, त्याची नोंद १ वाजून ८ मिनिटे, अशी केली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे बाळाचा जीव गेला आहे. वर्षा यांना आधी दोन मुली आहेत. आता मुलगा झाला होता. या प्रकरणी रवी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.या संदर्भात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील म्हणाल्या, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. ढगे यांच्या वेळी एक डॉक्टर होते. मात्र, अन्य ओपीडीत व्यस्त होते. घडल्याप्रकरणी चौकशी करून कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल