शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मुलांचे आर.टी.ई. शालेय प्रवेश 15  सप्टेंबरपर्यंत करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 18:08 IST

लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये.

ठाणे : आर.टी.ई. शालेय प्रवेश प्रक्रियेसठी ज्या बालकांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे, त्या बालकांचे शालेय प्रवेश 15 सप्टेंबरपर्यंत पालकांनी शाळेत जाऊन निश्चित करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे. 

  लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची 'तारीख' या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊनमुळे बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि व्हॉट्स अप किंवा ईमेल, अन्य माध्यमे आदींद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा तात्पुर्ता प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे.  

          वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8 वीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाने या घटकातील बालकांसाठी इ.1 लीच्या मंजूर जागांच्या 25 टक्के प्रवेश हे त्या त्या शाळांच्या प्रथम प्रवेशस्तरावर करावयाचे आहेत. ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील आर.टी.ई. चे 25 टक्के प्रवेशासाठी 31 मार्च रोजी लॉटरीद्वारा निवड  प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. त्यात न ऊ हजार 326 बालकांची निवड झाली आहे. शाळांनी शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ही बडे यांनी स्पष्ट केले आहे. 

 * पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-

1) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि  छायांकित प्रती.2) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लीक करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.