शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुलामुलींची नोंद ‘गुड्डागुड्डी’च्या रकान्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:47 IST

गावातील मुलींचा जन्मदर त्वरित लक्षात यावा आणि त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

ठाणे : गावातील मुलींचा जन्मदर त्वरित लक्षात यावा आणि त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यास अनुसरून आता संबंधित गावात जन्मलेल्या बालकांची नोंद त्याच दिवशी अंगणवाडी केंद्रातील फलकावर केली जाणार आहे. यासाठी गुड्डा (मुलगा) - गुड्डी (मुलगी) असे दोन रकाने असलेल्या फलकांचे जिल्ह्यातील सुमारे २५० अंगणवाडी केंद्रांत वाटपही केले आहे.येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात ‘गुड्डा-गुड्डी’ असे दोन भाग असलेले फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नव्या संकल्पनेनुसार संबंधित गावपाड्यांतील मुलींच्या जन्मदराची माहिती त्वरित मिळणे शक्य होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २५० अंगणवाड्यांमध्ये ‘गुड्डा-गुड्डी’असलेले फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गावात मुलगा किंवा मुलगी जन्माला येताच या फलकाच्या संबंधित रकान्यात त्यांची नोंद अंगणवाडीसेविकेद्वारे त्याच दिवशी घेतली जाणार आहे. जन्मलेल्या नवजात बालकांची दररोज आकडेवारी या ‘गुड्डा-गुड्डी’ फलकावर नोंदवण्याचे काम जिल्ह्यात सुरू झाले आहे.संबंधित गावाच्या प्राथमिक माहितीसह नवजात बालकांची नोंद घेऊन गावातील बालकांच्या आकडेवारीचा अहवाल अद्ययावत ठेवला जाणार आहे. यासाठी एक हजार १५४ अंगणवाड्यांना फलक दिले जातील. त्यापैकी सुमारे २५० अंगणवाड्यांना ते दिले आहेत. आता प्रत्येक अंगणवाडीच्या प्रथमदर्शनी भागात रोजची नोंद घेतलेला हा फलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नवजात बालकांचा दर तसेच त्यातील मुलींचे प्रमाण एका नजरेत लक्षात येईल. रोजची नोंद असलेले फलक अंगणवाड्यांकडून मागवल्यास अवघ्या काही मिनिटांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जन्मदराचा आकडेवारीचा अहवाल सहज मिळवता येणार असल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.>अंगणवाडी केंद्राला भेट देणारे पाहुणे, अभ्यासक तसेच शासकीय यंत्रणा आदींना या फलकाद्वारे मुलींच्या जन्मदराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. संबंधित गावातील मुलींच्या जन्मदरासाठी आता मोजणी किंवा त्यांच्या सर्वेक्षणाची गरज नाही.