शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या हत्येतील आरोपीस बेड्या; मोठ्या बहिणीला मारहाण केल्याचे पाहिले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:40 IST

आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या एकाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षीय मुलाने पाहिले असता, हे प्रकरण मुलगा आईला सांगेल, या भीतीने त्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी २४ तासांत संभाजीनगर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत कामत यांनी दिली. आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कन्नड येथून घेतले ताब्यात  अमोल चव्हाण (२२) असे आरोपीचे नाव आहे. तर सुधीर विष्णू पवार (६) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. हायवे दिवे येथील ओमसाई राम बिल्डिंग येथील सुधीर यास २१ जुलै रोजी बेशुद्धावस्थेत कळवा येथील शासकीय रुग्णालयात त्याचे नातेवाईक उपचारासाठी घेऊन गेले होते. डॉक्टरांनी सुधीरला मृत म्हणून जाहीर केले. 

 शवविच्छेदन अहवालातून सुधीरचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे व त्यांचे पथक अमोल याच्यावर संशय आल्याने त्याच्या शोधासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे दाखल झाले. तिथे लपून बसलेल्या अमोलला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

छतावर नेले आणि गळा आवळला २१ जुलै रोजी अमोल याने सुधीरची मोठी बहीण चंपा हिची छेड काढली होती व मारहाण केली होती. ते सुधीरने  पाहिले होते. ही घटना आई-वडिलांना सांगणार, असे सुधीर म्हणाला होता. त्यामुळे अमोलने सुधीरला इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून त्याची हत्या केली होती.

टॅग्स :Arrestअटक