शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू; डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 06:21 IST

बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात नसल्याने अशा घटना घडतात.

डोंबिवली : पूर्वेकडील सागर्ली परिसरातील एका सात मजली इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून वेदांत जाधव या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. वेदांत हा सकाळी १०.३० वाजता खेळण्याकरिता घराबाहेर पडला. खेळताना चेंडू त्या खड्ड्यात पडला. तो काढताना पाण्यात बुडून वेदांतचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

डोंबिवली सागर्ली येथील नरेश स्मृती बंगल्याशेजारील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर वेदांत हा वडील हनुमंत आणि आजी-आजोबांसोबत राहत होता. याच इमारतीच्या समोर तळमजला अधिक सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या सुमारे आठ फूट खोलीच्या खड्ड्यात पाणी साचले होते. सकाळी खेळण्यासाठी बाहेर पडलेला वेदांत बेपत्ता झाल्याने त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता दुपारी अडीचच्या सुमारास वेदांतचा मृतदेह खड्ड्यातील पाण्यात तरंगत्या अवस्थेत आढळून आला. पाण्यात हिरव्या रंगाचा चेंडू तरंगत होता. संबंधित इमारतीचे बांधकाम २०१२ पासून सुरू आहे. संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात नसल्याने अशा घटना घडतात.

वेदांतचा होता शेजाऱ्यांना लळा वेदांतचे वडील हनुमंत हे खाजगी कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करतात. वेदांतचा लळा घरातल्या व्यक्तींसह शेजारी राहणाऱ्यांनाही लागला होता. वेदांतवर त्यांचा अत्यंत जीव होता. त्याचे लाड पुरवणे, त्याच्याबरोबर खेळणे, गाडीवर फिरायला घेऊन जाणे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात होत्या. बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळून येताच घरातील व्यक्तींसह शेजाऱ्यांनी फोडलेला टाहो ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले.