शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

बालविकास केंद्रे पुन्हा सुरू

By admin | Updated: February 3, 2016 02:07 IST

कुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले

सुनील घरत,  पारोळकुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी नुकतेच आदिवासी विकास विभागाच्या निधीद्वारे ग्राम बाल विकास केंद्रे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रांचा निधी बंद केल्याचे कारण सांगून राज्य सरकारने गेल्या आॅगस्ट-२०१५ पासून राज्यातील कुपोषित बालकांसाठी चालविण्यात येणारी व्ही.सी.डी.सी योजना म्हणजेच ग्राम बाल विकास योजनेची केंद्रे बंद केली होती. पालघर जिल्हयात हजारोंच्या संख्येने अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत असृताना महाराष्ट्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रे बंद केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्ह्यात तसेच मुंबईही सलग विविध साखळी आंदोलने केली.पालघरच्या जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून कुपोषणाच्या प्रश्नाकडे पालकमंत्री आणि शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या शिष्टमंडळामधे ग्राम बाल विकास केंद्रे (व्ही.सी.डी.सी)सरकार लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन मान मुख्यमंत्र्यानी दिले होते. मात्र ते बराच काळ अंमलात न आणता, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलात कुपोषण निर्मूलनाविषयीची पंचतारांकीत परिषद मात्र सरकारने आयोजित केली असता ती लढवय्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती .> कुपोषित बालकांवरील उपचारासाठी आवाहनमधल्या काळात श्रमजीवी संघटनेच्या पुढाकारातून जव्हार येथील पतंगशहा कुटिर रुग्णालयात विठु माऊली ट्रस्ट आणि विधायक संसद या संस्थांच्या सहयोगाने कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिरही आयोजण्यात आले. २०१६ च्या नवीन वर्ष आरंभीच संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी गंभीर कुपोषित बालकांवरील उपचारासाठी समाजातील सामान्य जनतेला व दात्यांना आवाहन करून जव्हारमध्ये बालसंजीवन छावणी सुरू केली.आदिवासी बालकांना जीवदान मिळविण्यासाठी एवढी सगळी आंदोलने आणि विधायक प्रयत्न होत आसताना शासनाच्या पातळीवर मात्र कुपोषित बालकांसाठी हालचाली होत नसल्याचे पाहून संघटनेने २६ जानेवारी २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला दि. २५ जानेवारी २०१६ रोजी पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात शासनाच्या उदासीन धोरणाबद्द्ल जोरदार आंदोलने केली होती.