सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील प्लेगृप मधील चिमुरड्याला शिक्षकेकडून मारहाण झाल्याची घटना उघड झाली. मुलाला मारहाणीची घटना १७ ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती पालकांनी देऊन, तेंव्हा पासून मुलगा बिमार पडल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळे जवळील एक्सलेंट प्लेग्रुप मध्ये ४ वर्षाचा मुलगा शिकवणीला जात होता. मुलगा बिमार पडल्याने, मुलाने शिक्षकेला याबाबत विचारणा केली. मात्र काहीएक कारण देण्यात आले नाही. दरम्यान एका मुलाला शिक्षकेकडून मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खरा प्रकार उघड झाला. मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुलाने कविता बोलून दाखविली नाही. तसेच टाळ्या वाजविली नाही. म्हणून मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.