शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या गैरहजेरीत मुलाने केले क्रीडा सभापतींचे पदग्रहण; भिवंडी पालिकेतील अफलातून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:54 IST

महानगरपालिकेच्या क्रीडा समिती कार्यालयात पदग्रहण समारंभास क्रीडा सभापती गैरहजर राहिल्याने त्यांच्या मुलाने पदग्रहण केल्याचा अफलातून प्रकार भिवंडी महापालिकेत गेल्या आठवड्यात घडला.

भिवंडी : महानगरपालिकेच्या क्रीडा समिती कार्यालयात पदग्रहण समारंभास क्रीडा सभापती गैरहजर राहिल्याने त्यांच्या मुलाने पदग्रहण केल्याचा अफलातून प्रकार भिवंडी महापालिकेत गेल्या आठवड्यात घडला. आश्चर्य म्हणजे, पदग्रहण सोहळ्याची औपचारिकता महापौरांसह स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत पार पडली. विरोधी पक्षासह शहरातील नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस-शिवसेना युतीने पालिकेमध्ये हा नवीन पायंडा पाडल्याची चर्चा सुरू आहे.महानगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेविका नाजेमा हदीस अन्सारी यांची निवड झाल्यानंतर पालिकेतील त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर जावेद दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नाजेमा अन्सारी काही कारणास्तव गैरहजर होत्या. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा मुलगा इरफान अन्सारी यांनी पदग्रहण करण्याची औपचारिकता पूर्ण केली. काँग्रेसचे महापौर जावेद दळवी आणि शिवसेनेचे स्थायी समिती सभापती मदनबुवा नाईक, सभागृह नेते प्रशांत लाड यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी सभापती नाजेमा अन्सारी यांचा मुलगा इरफान अन्सारी यास पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. वास्तविक, मनपा अधिनियमानुसार, निवडून आलेले सदस्यच पालिकेच्या कामकाजात सहभाग घेऊन पदभार सांभाळतात. त्यांच्या घरातील सदस्य पालिकेच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, अनेक महिला सदस्यांचे पती पालिकेत नगरसेवक म्हणून मिरवत कामात हस्तक्षेप करताना दिसतात. मागील आठवड्यातील या घटनेमुळे नगरसेवकांच्या कुटुंबीयांचा पालिकेतील हस्तक्षेप वाढेल.मनपात निवडून आलेले काही नगरसेवक नियमांची पायमल्ली करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे अधिकारीदेखील दुर्लक्ष करत आहेत. आयुक्त मनोहर हिरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन क्रीडा समिती सभापती नाजेमा हदिस अन्सारी यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी