शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला बालमजूरी विरोधी संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:06 IST

चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली. मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले.

कल्याण: चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली.मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले. चिरंजीवी संघटना लहान मुलांच्या विविध प्रश्नांवर काम करीत असते. पथनाट्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या प्रश्नांविषयी समाजात जनजागृती करीत असते. मुलांना समुपदेशन क रणे, त्यांच्यातील कलागुणांची ओळख व्हावी म्हणून विविध प्रकारचे गेम घेणे अशी कामे संस्थेच्या माध्यमातून केली जातात. ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संस्थेत कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, अंधेरी या परिसरातील सुमारे १२० हून अधिक मुलांचा समावेश आहे. एका पथनाटयात १० ते १२ मुलांचा सहभाग असतो. प्रत्येक पथनाटय सादरीकरण करताना नव्या मुलांना संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. समाजात जनजागृती करण्यासाठी लहान मुले हे प्रभावी माध्यम आहे. एखादी गोष्ट लहान मुलांनी सांगितल्यास समाज त्यांचे लवकर अनुकरण करतो. यापूर्वी संस्थेने फटाकेमुक्त दिवाळी, सरकारी योजनापासून दुर्लक्षित राहणारी मुले, लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारी कुपोषणाची समस्या आदी विषयावर पथनाटय बसविली आहेत. आता संघटनेतर्फे बालमजूरी विरोधी पथनाटय बसविले होते. कल्याणमधील सिध्दार्थनगर, आनंदवाडी आणि मिंलिदनगर या तीन ठिकाणी हे पथनाटय सादर करण्यात आले. हे पथनाटय संदीप बनसोडे, सुजल जठार, वैष्णवी जठार, सक्षम पवार, हर्ष तेलुरे, ऐश्वर्या तोडकरी, सुमित तायडे, अंजली वाघ, राहुल भाट, हर्षद चौधरी या लहान मुलांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सादर केले.पथनाटयाच्या माध्यमातून बालपण वाचवा, देश वाचवा तसेच बालमजुरी पूर्णत: बंद झाली पाहिजे. व त्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जर कोणाला कोठेही बालमजूर काम करताना आढळला तर त्याठिकाणी जाऊन ते थांबविण्याचा प्रयत्न आपल्यापासून झाला पाहिजे, असे आवाहान संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे