शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चिखलोली रेल्वेस्थानकाला अखेर मिळाला मुहूर्त; दोन वर्षांत स्थानक होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:56 IST

८ सप्टेंबरपासून होणार जमीनमोजणी, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे.

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील प्रस्तावित चिखलोली रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी सुमारे साडेआठ एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून या जागेची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ८ सप्टेंबरपासून मोजणी करणार आहेत. या कामासाठी जिल्हा प्रशासनानेजमीनमालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत. तसेच येत्या दोन वर्षांत हे स्थानक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्यात बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांकडे सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वाढत आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून बदलापूर रेल्वेस्थानक सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहेत. या दोन्ही रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या आजूबाजूच्या छोट्या गावांचेही मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे या दोन स्थानकांच्या मध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना उपगनगरीय लोकल पकडण्यासाठी अंबरनाथ किंवा बदलापूर रेल्वेस्थानकात यावे लागते.

त्यामुळे सकाळी-संध्याकाळी रेल्वेस्थानकांमध्ये प्रचंड गर्दी असते. ती कमी करण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात नवे रेल्वेस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. मध्य रेल्वे प्रशासनाने चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्यासाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. ते उभारण्याचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला देण्यात आले. या कॉर्पोरेशनच्या संकल्पनेनुसार यासाठी सुमारे साडेआठ एकर जागेची आवश्यकता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्यामुळे मागील काही दिवसांपासून चिखलोली रेल्वेस्थानकाच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, येत्या ८ सप्टेंबरला स्थानकाच्या जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागामालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत.- जगतसिंग गिरासे, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर

टॅग्स :railwayरेल्वे