शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख्यमंत्र्यांची उपोषणकर्त्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना भेट; समस्या सोडवण्याचे आश्वासन

By सुरेश लोखंडे | Updated: September 26, 2022 20:26 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरण उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संध्याकाळी भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

ठाणे: जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या कर्मचारी अधिसंख्ये पदावर सध्या कार्यरत आहेत. तर बहुतांशी कर्मचारी सेवा निवृत्त झाले, काहींचे निधनही झाले मात्र त्यांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ मिळाला नाही. तो मिळावा म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरण उपोषणाला बसलेल्या या कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संध्याकाळी भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री आले असता त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. याचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांनी त्यांना लेखी निवेदन दिले आणि त्यांच्या समक्ष मुख्य सचिवांना दूरध्वनी करून या अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी बैठक लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्यामुळे या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.

या कर्मचाऱ्यांनी आॅर्गनाईझेशन फॉर राईटस् आॅफ ह्युमन (आॅफ्रोह) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत अमरणपोषण सुरू केले आहे. आजचा त्यांचा पहिला दिवस आहे. त्यांच्या या अमरण उपोषणाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस भास्कर गव्हाळे, अध्यक्षा प्राची चाचड आदींनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे गव्हाळे यांनी सांगितले.

अनुसूचित जमातीच्या कर्मचाºयांचे अस्सल जात प्रमाणपत्र, वादग्रस्त जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फसवणूक करुन अवैध व जप्त केल्याचा आरोप या उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या कर्मचाºयांना ११ महिन्यांसाठी अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. मागील ३३ महिन्यात एक हजार अधिसंख्य कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना पेन्शन लागू केली नाही, तर मयत कर्मचाºयांच्या वारसांना कुटुंबनिवृत्ती वेतनसुध्दा दिले नाही.

सरकारने २० सप्टेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे लक्षात आणून दिले होेते. पण तसे न झाल्यामुळे या कर्मचाºयांनी आता अमरण उपोषणाचे हत्यार उपसून आजपासून बेमुदत उपोषण राज्यभर सुरू केले आहे. ठाण्यातील या कर्मचाºयांच्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आज दिले आहे. या उपोषणात आनंदाराव सोनावणे, सुधाकर कोळी, मुरलीधर हेडाऊ, प्रिया रामटेककर,दयानंद कोळी, रविंद्र निमागावकर, अर्जुन मेस्त्री, घनश्याम हेडाऊ, पांडूरंग नंदनवार, प्रकाश कोळी, नरेंद्र भिवापूरकर सुधीर मग्गीरवार आदी कर्मचाºयांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :thaneठाणे