शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

By सुरेश लोखंडे | Updated: December 26, 2022 18:18 IST

राज्याच्या मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी सचिवाल कक्ष सुरू करून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

ठाणे : सर्वसामान्‍य जनतेचे दैनंदिन प्रश्‍न, शासन स्‍तरावर असलेली कामे, प्राप्‍त होणारे अर्ज, निवेदने इत्‍यादीवर वेळेत कारवाई करुनलोकाभिमुख, पारदर्शकता व प्रशासन गतिमान करण्यासाठी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय आजपासून स्‍थापन करण्‍यात आले आहे. 

राज्याच्या मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी सचिवाल कक्ष सुरू करून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्‍यासाठी हे मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.जिल्‍ह्यातील उपलब्‍ध अधिकारी, कर्मचारी यांच्‍यामधून आवश्‍यक अधिकारी, कर्मचारी यांच्‍या सेवा या मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्‍ध करुन देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी हे या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी आहेत. त्याशिवाय एक नायब तहसिलदार व एक अव्वल कारकून व एक लिपिक टंकलेखक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा शहरी आणि ग्रामीण, दुर्गम, डोंगरी अशा भागात विभागला आहे. ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील नागरिकांचे शेती, नागरी, विकास कामांच्या समस्यासंदर्भातील प्रश्न, तक्रारींचा निपटारा झटपट होण्यासाठी या कक्षामुळे मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व डोंगरी भागातील नागरिक हे पहाटे निघून मंत्रालयात कामासाठी जात असतात. अशा नागरिकांचे प्रश्न गतिमानतेने, पारदर्शकपणे व विनाविलंब जिल्हास्तरावरच मार्गी लागावे, यासाठी ठाणे जिल्ह्यात क्षेत्रिय कार्यलय सुरू करण्यात आले आहे. जिल्‍हास्‍तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित असलेल्या अर्ज व निवेदन अशी प्रकरणे जिल्‍हा स्‍तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्‍यावर तातडीने कार्यवाही शासन स्तरावरील निर्देशान्वये करण्याच्या सुचना संबंधीत कक्षास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या नावे प्राप्त होणारे अर्ज, निवदने व संदर्भ स्विकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची पोचपावती संबंधितांना देऊन हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. यावर केलेल्या कार्यवाहीचा मासिक आढावाही शासनाला सादर करण्यात येईल., असे या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे