शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुन्हा ‘सुखरूप’ लँडिंग! पायलटचे प्रसंगावधान, थोडक्यात दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 06:21 IST

पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे गुरूवारी पाचव्यांदा ‘सुखरुप’ लँडिंग झाले. मीरा-रोडमध्ये घडलेल्या घटनेने मुख्यमंत्र्यांचा हवाईदौरा कधी निर्धोक होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून हेलिकॉप्टर दौºयाच्या सुरक्षेची फेरसमिक्षा करण्याची वेळ आली आहे.

मीरा रोड : पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे गुरूवारी पाचव्यांदा ‘सुखरुप’ लँडिंग झाले. मीरा-रोडमध्ये घडलेल्या घटनेने मुख्यमंत्र्यांचा हवाईदौरा कधी निर्धोक होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून हेलिकॉप्टर दौºयाच्या सुरक्षेची फेरसमिक्षा करण्याची वेळ आली आहे.घडले ते असे- वरसावे खाडीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाºया नवीन पूल व अन्य विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुंबईहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मीरा रोडला आले होते. त्यासाठी सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकॅडमी शाळेलगतच्या मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. मात्र, जवळच्या इमारतींवरील केबल्स तशाच होत्या. हेलिकॉप्टर खाली उतरवत असताना पायलटच्या ही बाब लक्षात आल्यामुळे त्याने अत्यंत सावधानता बाळगत लँडिंग केल्याने मोठी दुर्घटना टळली.गेल्या वर्षभरातील ही अशाप्रकारची सहावी घटना आहे.हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा गर्दी!फडणवीस व गडकरी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य दोन-तीन मंत्री मुंबईला याच हेलिकॉप्टरमधून परतणार होते. मात्र एवढे ‘ओझे’ पेलवणार नाही, असे पायलटने बजावल्याने मग सगळ्यांनी रस्ता धरला.दोन दिवसांपूर्वी दिला होता इशाराहेलिपॅड उभारण्यापूर्वी पोलीस, जिल्हा प्रशासन व भाजपा पदाधिकारी यांनी संबंधित ठिकाणाची पाहणी केली, तेव्हा इमारतीवरून इंटरनेट केबल गेल्याचे निदर्शनास आले होते. त्या तातडीने हटवण्याची सूचना केली होती, असे भाजपा पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.प्रशासनाकडून सारवासारव!मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला सातत्याने ‘अडथळ’ येत असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र प्रत्येकवेळी सारवासारव केली जाते. मीरा रोडमध्येही त्याचा प्रत्यय आला. आजच्या घटनेला प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दुजोरा दिलेला असताना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याचा इन्कार केला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे