शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाढवणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 06:09 IST

शरद पवारांचा सल्ला : शिष्टमंडळाशी केली सविस्तर चर्चा

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध पाहता आपल्या भूमिकेवर ठाम राहावे. त्यासाठी लवकरच आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले.केंद्राने वाढवण बंदराची घोषणा केल्यानंतर स्थानिकांचा विरोध वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आल्यानंतर पूर्वीही मी आपल्यासोबत होतो, आताही मी तुमच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी संघर्ष समितीला दिली होती. त्यानंतर आजपर्यंत अनेक संघटनांनी, स्थानिक आमदार, खासदारांनी वाढवण बंदराला आपला विरोध असल्याचे पत्र बंदरविरोधी समितीला दिले आहे. असे असले तरी वाढवणमध्ये सर्वेक्षणाच्या हालचालीदरम्यान स्थानिकांनी उभ्या केलेल्या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधींच्या असलेल्या गैरहजेरीमुळे स्थानिकांच्या मनात संशयाचे ढग जमू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर झाई ते कुलाबादरम्यानच्या किनारपट्टीवरील स्थानिकांनी उभारलेल्या अभूतपूर्व एकजुटीची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेत संघर्ष समिती, मच्छीमार संघटनांना भेटीला बोलावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे डहाणूमध्ये एका खाजगी कार्यक्रमाला येऊन गेल्यानंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध पाहता आघाडी सरकारने स्थानिकांसोबत राहावे, यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ आदी संघटनांनी शुक्रवारी यशवंतराव प्रतिष्ठान सेंटर, मुंबई येथे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी बाळासाहेबांनी बंदराला स्थानिकांचा कडवा विरोध पाहता त्यांच्यासोबत राहत बंदर होऊ दिले नव्हते. आजही स्थानिकांचा विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या सोबत राहावे, यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तर, खा. सुळे यांनी आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी चर्चा करून स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांच्यासोबत हे बंदर रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

वाढवण बंदरास स्थानिकांचा व मच्छीमारांचा वाढता विरोध पाहता शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात स्थानिकांसोबत राहावे.- अनिकेत पाटील, कार्याध्यक्ष, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार