शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:05 IST

या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी सोमवारी सकाळी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन दिले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा  लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असताना राज्यातही १८ ते २२ जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्व. आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याचि देही याचि डोळे पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील  या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू.-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

  • घरावर भगवे ध्वज फडकवणे, मंदिरांना रोषणाई करणे, असे आवाहन यापूर्वीच केले आहे. पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने नेते,पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. 
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याEknath Shindeएकनाथ शिंदे