शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

अखेर सावत्र भावाच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक: साथीदाराला दिली दोन लाखांची ‘आॅफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 22:52 IST

ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची हत्या करुन पसार झालेला त्याचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (२६, रा. ठाणे) याला अखेर अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. या खूनासाठी मदत करणारा साथीदार चालक गौरव सिंग याला दोन लाख रुपये देण्याचीही त्याने आॅफर दिली होती, अशी माहिती चौकशीत उघड झाली.

ठळक मुद्देठाण्यातील नगरसेवकाच्या मुलाचे खून प्रकरणतीन किलो ७०० ग्रॅम सोन्यासह गावठी रिव्हॉल्व्हरही हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संपत्तीच्या वादातून ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची हत्या करुन पसार झालेला त्याचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (२६, रा. ठाणे) याला अखेर अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून तीन किलो ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने, गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमालही जप्त केला आहे. या खूनात मदतीसाठी त्याने चालक गौरव सिंग याला दोन लाख रुपये देण्याचीही आॅफर दिली होती.वाघबीळ येथे राहणारा नगरसेवक माणिक पाटील यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश पाटील (३५) हा स्कूटरसह बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी कविता पाटील हिने २० सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान राकेशचे वडिल हे १५ सप्टेंबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. ते २० सप्टेंबर रोजी त्यांच्या तिसऱ्या पत्नीसह घरी परतले. त्यावेळी घरातील तिजोरी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा बेपत्ता मुलगा राकेशनेच ही चोरी केल्याचा संशय बळावल्याने त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात माणिक पाटील यांनी चोरीची तक्रारही दाखल केली. बेपत्ता राकेशची आणि चोरीस गेलेल्या सोन्याचा समांतर तपास वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. दरम्यान, बेपत्ता झालेल्या राकेशची स्कूटर माणिक पाटील यांचा चालक तसेच सावत्र मुलगा सचिन सर्जेराव पाटील (माणिक पाटील यांच्या तिसºया पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा) याचा साथीदार गौरव सिंह (२७) याच्याकडे असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. त्याच आधारे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी रात्री गौरवला आझादनगर येथील घरातून त्याला अटक केली. त्याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने राकेशचा सावत्र भाऊ सचिन पाटीलसह दोघांनी कट रचून २० सप्टेंबर रोजी राकेशला दारु पाजून घरी झोपवले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सचिन याने त्याच्या पिस्टलमधून राकेशच्या कपाळावर गोळी झाडून त्याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह चादर आणि सोफ्याच्या कव्हरमध्ये गुंडाळून ते राकेशच्या गाडीच्या डिक्कीत ठेवून तो वाशी खाडीच्या पूलावरुन पाण्यात फेकल्याची कबूली दिली. त्यानुसार याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सचिन आणि गौरवविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गौरवच्या अटकेनंतर पसार झालेल्या सचिनचा सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक रुपाली रत्ने आणि कुलदीप मोरे या तीन पथकांमार्फत अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उलवे, नवी मुंबई परिसरात शोध घेण्यात येत होता. फोनही वापरणे त्याने बंद केले होते. अखेर नवी मुंबईतील उलवे येथे तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. गौरवच्या मदतीनेच आपण संपत्तीच्या वादातून राकेशचा खून केल्याची कबूलीही सचिनने दिली. या खूनाच्या मदतीसाठी गौरवला दोन लाख रुपये देण्याचेही ठरले होते. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि तीन किलो ७०० ग्रॅम सोन्याचे दागिनेही हस्तगत केले आहेत. अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरुपाच्या गुन्हयाचा शोध लावल्याबद्दल उपायुक्त बुरसे यांनी या तपास पथकाचे कौतुक केले आहे. सचिन याला ४ आॅक्टोबरपर्यत तर गौरवला १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* राकेशचा मृतदेह वाशी येथील खाडीमध्ये फेकल्याचे आरोपींनी सांगितल्यामुळे या मृतदेहाचा स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे बुरसे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून