शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

‘त्या’ हल्लेखोराला बेड्या, नौपाडा पोलिसांनी लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:24 IST

मासुंदा तलाव परिसरातील एका सोळावर्षीय तरुणीवर मिरचीपूड फेकून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या अब्दुल समद नूरमहंमद शाखानी (२१, रा. मुंब्रा ) याला नौपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाने रविवारी मुंब्य्रातून जेरबंद केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली.

ठाणे : मासुंदा तलाव परिसरातील एका सोळावर्षीय तरुणीवर मिरचीपूड फेकून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या अब्दुल समद नूरमहंमद शाखानी (२१, रा. मुंब्रा ) याला नौपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाने रविवारी मुंब्य्रातून जेरबंद केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली. त्याला १७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यात राहणारी ही तरुणी चरई येथील डान्स क्लासमधून घरी पायी जात असताना २५ एप्रिल २०१८ रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास समोरून येऊन शाखानी याने मिरचीची पूड तिच्या डोळ्यांवर टाकून हल्ला केला होता. अनपेक्षितपणे अचानक झालेल्या या हल्ल्याने या मुलीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. तिच्या डोळ्यांत मिरचीची पूड गेल्यामुळे ती तिथेच आक्रोश करत बसली. तिच्या आक्रोशाने जमावानेच तिला सावरले आणि पोलिसांनाही पाचारण केले. नौपाडा पोलिसांनी तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखलही केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य पाहून सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी घटनास्थळापासून दोन ते तीन किलोमीटर परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यात एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाल्याचे आढळले. त्यातून अब्दूलला मुंब्य्रातून अटक करण्यात आली.>त्याला नशेची सवय असून मासुंदा तलावाभोवती फिरताना पाहिलेली प्रेमीयुगुले पाहून आपल्यालाही एखादी गर्लफ्रेण्ड असावी, या असूयेपोटी हे कृत्य केल्याची त्याने कबुली दिली. तो माथेफिरू असल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याने कोणावर आणखी एखादा असाच प्रकार करण्यापूर्वी तो पकडण्यात यश आल्याचे सायगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे