शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

म्यूकरमायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालय होणार सज्ज; एकनाथ शिंदे यांचे महापालिकेला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 22:21 IST

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या बुरशीजन्य रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्याने त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे व एमएमआर क्षेत्रात या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना कसा दिलासा देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. त्याशिवाय या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकता असल्यामुळे ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याशिवाय या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचे देखील निश्चित करण्याचे करण्यात आले. 

म्युकरमायकोसीस या आजारासाठी लागणारी इजेक्शन्स महाग असल्याने त्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्यांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिले. ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना हा आजार लवकर होत असल्याचे निदर्शनास आल्याने ज्या रुग्णांना मधुमेहासह कोरोनाही झाला होता, आशा रुग्णांची यादी तयार करून त्यांना वेळीच संपर्क करून त्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत नाहीत ना, याची तपासणी करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. रुग्णांवर वेळीच उपचार झाले तर म्युकरमायकोसिस झालेला रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णापर्यंत वेळच्या वेळी उपचार पोहोचायला हवेत, असे निर्देश शिंदे यांनी सर्वांना दिले.  बैठकीला पालकमंत्री शिंदे यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष भूमकर, कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावाकोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात सुरू असलेल्या लहान मुलांच्या खास वॉर्डच्या कामाचा आढावा देखील शिंदे यांनी या बैठकीत घेतला. त्यासोबतच जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धतेची माहिती देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcorona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस