शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

जनसंपर्क अधिकाऱ्याकडे सापडले कोरे चेक, फायली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:44 IST

रजेवर जातानाही महापालिकेतील आपल्या कार्यालयाची चावी सोबत घेऊन गेलेले जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयात कोरे चेक

उल्हासनगर : रजेवर जातानाही महापालिकेतील आपल्या कार्यालयाची चावी सोबत घेऊन गेलेले जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयात कोरे चेक, राज्य सरकारतर्फे दिली जाणारी उपायुक्ताची बनावट ओळखपत्रे आणि विविध विभागाच्या ५० पेक्षा अधिक फायली सापडल्या. त्यांच्या केबिनची बुधवारी इन कॅमेरा झाडाझडती घेण्यात आली. त्यात हा ऐवज सापडल्याने आयुक्त नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे नियुक्तीच्या दिवसापासून वादात सापडले आहेत. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून महासभेने त्यांना बडतर्फ केले. मात्र त्या बडतर्फीला न्यायालयीन स्थगिती मिळाल्याने ते कामावर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या बनावट जन्मतारखेची चर्चा सुरू आहे. १४ मे पासून भदाणे रजेवर आहेत. पण जाताना नियमानुसार त्यांनी केबिनची चावी पालिकेत जमा न करता स्वत:सोबत नेल्याची आणि केबीनमध्ये काही फायली लपवल्याची तक्र ार रिपब्लिकन पक्षाचे गटनेता भगवान भालेराव यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली. त्यात तथ्य आढळल्याने आयुक्तांनी उपायुक्त संतोष दहेरकर यांना केबीन सील करण्याचे आदेश दिले. भदाणे यांच्या वाहनचालकाने बुधवारी चावी पालिकेत जमा केली. त्यानंतर पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशानुसार मुख्यालयाचे उपायुक्त संतोष देहरकर, रिपाइं नगरसेवक भगवान भालेराव, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, मनीष हिवरे, अन्य अधिकारी, नगरसेवक, पत्रकारांसमक्ष भदाणे यांची सीलबंद केबीन इन कॅमेरा उघडण्यात आली. तेव्हा त्यात राज्य शासनाची उपायुक्तपदाचीच राजमुद्रा असलेली विविध ओळखपत्रे सापडली. विविध विभागाच्या १२८ फाईल्स, काही कोरे; तर काही रकमा भरलेले १८ चेक, १७ सीडी, ११ रबरी स्टॅम्प सापडले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती नेटके यांनी दिली. फाईल चोरीप्रकरणी सध्या भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी तुरूंगात आहेत. त्यातच भदाणे यांच्या केबीनमधून घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात आयुक्त पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले, भदाणे यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या सामग्रीची प्रशासन तपासणी करत आहे. याबाबत कोणती कारवाई करणार, असे विचारता आयुक्तांनी संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.पालिकेचे यापूर्वीचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी वरिष्ठ अधिकाºयांना डावलून भदाणे यांची विशेष अधिकारीपदी नियुक्ती केली होती.त्यांच्या खास मर्जीतील भदाणे यांच्याकडे मालमत्ता कर विभाग, अतिक्र मण विभाग, वादग्रस्त ठरलेले शिक्षण मंडळ, राजीव गांधी आवास योजना, पाणी पुरवठा योजना आदी महत्वाच्या विभागाचा पदभार होता. त्यामुळे प्रचंड नाराजी होती. सध्याचे आयुक्त पाटील यांनी मात्र भदाणे यांच्याकडील विशेष अधिकारीपद काढून त्यांचे मूळ जनसंपर्क अधिकारीपद कायम ठेवले होते.