शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

उत्तनवासीयांची चक्क फसवणूक, जनआक्रोश आंदोलनात फूट पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:15 IST

उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाच्याठिकाणी साचलेल्या १० लाख मेट्रिक टन कचऱ्याची बायो मायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ५६ कोटी २० लाख तर बायो मायनिंगसह घनकचरा प्रकल्पाच्या विविध बाबींसाठी एकूण ८३ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असताना सत्ताधारी भाजपाने अर्थसंकल्पात ८ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे.

मीरा रोड : उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाच्याठिकाणी साचलेल्या १० लाख मेट्रिक टन कचऱ्याची बायो मायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ५६ कोटी २० लाख तर बायो मायनिंगसह घनकचरा प्रकल्पाच्या विविध बाबींसाठी एकूण ८३ कोटी ८३ लाख रु पयांचा खर्च अपेक्षित असताना सत्ताधारी भाजपाने अर्थसंकल्पात ८ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. तरतूदच नसताना बायो मायनिंग या नव्या गोंडस नावाखाली उत्तनवासीयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेस व शिवसेनेने केला आहे. साचलेले कचºयाचे डोंगर पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. शिवाय डम्पिंग विरोधात छेडले जाणारे कचरा बंद जनआक्रोश आंदोलनात फूट पाडून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपा व प्रशासनाची ही खेळी असल्याचा आरोपसुद्धा केला आहे.उत्तनच्या धावगी डोंगरावर सरकारने मीरा- भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर सरकारी जागा विनामूल्य दिली होती. परंतु त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असून पालिका डोळेझाक करत आली आहे. तर घनकचरा प्रकल्पाच्या नावाखाली पालिकेने बेकायदा डम्पिंग तयार केले असून कच-याचे डोंगर झाले आहेत. येथील शेती नष्ट होऊन विहरीचे पाणी दूषित झाले आहे. दुर्गंधी, धूर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संघर्ष समितीने हरित लवादाकडे दाद मागितल्यावर लवादासह सर्वोच्च न्यायालयातही महापालिकेने साचलेल्या कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करून विल्हेवाट लावू असे प्रतिज्ञापत्र दिले होते.आयआयटीने पालिकेला बायो मायनिंग पद्धतीने साचलेल्या कचºयावर प्रक्रीया करण्यास सांगितले आहे. आयसीयूसी कंपनीला पालिकेने दैनंदिन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी सल्लागार म्हणून नेमले. या सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार उत्तन येथे १० लाख मेट्रिक टन इतका कचरा पूर्वीपासून साचलेला आहे. साचलेल्या कचºयावर बायो मायनिंग पद्धतीने प्रक्रि या करण्यासाठी तब्ब्ल ५६ कोटी २० लाख खर्च होणार आहे. तर हा खर्च व घनकचरा व्यवस्थापनाच्या अन्य बाबींसाठी होणारा खर्च मिळून एकूण ८३ कोटी ८३ लाख खर्चाचा अहवाल आहे. हा अहवाल पालिकेने तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेला आहे. तर प्रकल्प अहवालाचा सुधारित गोषवारा आयुक्त बळीराम पवार यांनी १८ एप्रिल रोजीच्या महासभेत सादर करणार आहे.ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नकाकचऱ्याचे साचलेले डोंगर व पावसाळ्यात हे डोंगर खचल्यास मोठा अनर्थ होईल. शिवाय कचºयाचे घातक असे दूषित पाणी शेती व गावात शिरण्याची भीती काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी व्यक्त केली आहे. भाजपाने तर ७ वर्षे हा प्रकल्प येथे कायम राहील असे कंत्राटदार नेमून स्पष्ट केले आहे. पण आता उत्तनवासियांचा अंत पाहू नये आणि प्रकल्प स्थलांतरित करण्याविषयी हालचाली करा अन्यथा आंदोलनातून प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सत्ताधारी व प्रशासनाची राहील असे सावंत म्हणाले.>पर्यावरणाचा -हास सहन करणार नाहीबायो मायनिंगसारखे प्रस्ताव आणून उत्तनवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केला आहे. पर्यावरणाचा डोळ््यादेखत चाललेला ºहास आता उत्तनवासीय सहन करणार नाही असे बगाजी यांनी म्हटले आहे.>प्रकल्प हटवण्यासाठी ग्रामस्थ सज्ज१० वर्षांनी पालिकेला सविस्तर प्रकल्प तयार करण्याची बुद्धी सुचली. पण साचलेला कचरा हा १० लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक असून आकडेवारी फसवी वाटत आहे. ग्रामस्थ हा कचरा प्रकल्प येथून हटवण्यासाठी सज्ज झाले आहेत असे विद्याधर रेवणकर म्हणाले .