शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
2
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
3
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले- "आता पर्याय...'
4
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
5
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
6
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
7
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
8
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
9
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
10
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
11
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
12
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
13
विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
14
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
15
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र
16
विक्री घटली! जूनमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाईच्या गोटात हाहाकार उडाला; महिंद्रा, एमजीने झेंडा रोवला...
17
पुढील शंभर वर्षांचा विचार करून नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करा; DCM अजित पवारांचे निर्देश
18
धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
19
तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी
20
लिस्ट होताच गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री; पहिल्याच दिवशी केलं मोठं नुकसान, ₹६९ वर आली किंमत

डेबिटकार्डचे ‘क्लोनिंग’ करून फसवणूक

By admin | Updated: January 3, 2017 05:24 IST

डेबिटकार्डचे ‘क्लोनिंग’ करून एका वृद्धास २० हजार रुपयांनी फसवल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकाने दिलेली

ठाणे : डेबिटकार्डचे ‘क्लोनिंग’ करून एका वृद्धास २० हजार रुपयांनी फसवल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकाने दिलेली माहिती सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.ठाण्यातील आनंद पार्क भागात राहणारे उल्हास बर्वे (६३) यांनी बुधवारी त्यांचे ‘एमटीएनएल’चे कार्ड आॅनलाइन रिचार्ज केले. ‘एमटीएनएल’च्या मुंबई आणि दिल्लीसाठी दोन वेगवेगळ्या वेबसाइट आहेत. बर्वे यांनी त्यांचे कार्ड रिचार्ज करताना चुकून मुंबईऐवजी दिल्लीच्या वेबसाइटवर आॅनलाइन व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण केली. चूक उमगल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार ‘एमटीएनएल’च्या वेबसाइटवर नोंदवली. काही वेळातच ८८७९७५६४७२ क्रमांकाच्या मोबाइल फोनवरून राहुल नामक व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. बर्वे यांनी ‘एमटीएनएल’कडे केलेल्या तक्रारीचा संदर्भ देत, त्यासाठी डेबिटकार्डाचा तपशील हवा असल्याचे त्याने सांगितले. बर्वे यांनी तपशील दिल्यानंतर त्यांच्या युको बँकेच्या खात्यातून लगेच २० हजार रुपये परस्पर काढण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बर्वे यांनी लगेच त्यांचे डेबिटकार्ड ‘ब्लॉक’ केले. आरोपीने आपल्या डेबिट कार्डचे ‘क्लोनिंग’ (बनावट कार्ड तयार करणे) केले असावे किंवा पासवर्ड हॅक केला असावा, असा संशय बर्वे यांनी राबोडी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)