शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेत नोकरीचे आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 20:17 IST

म्हाडाच्या गृहसंकुलामध्ये अल्पदरात घर मिळवून देण्याच्या नावाखाली खंडाळा (जि. सातारा) येथील बेबीताई सोळेकर यांच्यासह १६ राज्यभरातील अनेकांना एक कोटींचा गंडा घालणा-या प्रशांत बडेकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. रिझर्व बँकेच्या मुंबई शाखेत लिपीक पदावर नोकरी लावण्याच्या नावाखालीही त्याने अनेकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देम्हाडाचे घर स्वस्तात देण्याचेही प्रलोभनठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाईराज्यातील नऊ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई येथे रिझर्व्ह बँकेत लिपिकपदाच्या नोकरीचे आमिष दाखवून, तसेच म्हाडाच्या गृहसंकुलामध्ये अल्पदरात घर मिळवून देण्याच्या नावाखाली खंडाळा (जि. सातारा) येथील बेबीताई सोळेकर यांच्यासह १६ जणांना एक कोटींचा गंडा घालणाºया प्रशांत बडेकर ऊर्फ अरविंद सोनटक्के (४२, रा. टावरीपाडा, कल्याण, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सातारा जिल्ह्यातील सोळेकर यांना कल्याण येथील प्रशांत बडेकर याने म्हाडामध्ये ओळख असल्याचे सांगितले होते. याच ओळखीतून तुम्हाला अल्पदरात घर मिळवून देतो, अशी त्याने बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रक्कम २०१९ मध्ये प्रशांतने घेतली होती. प्रशांत हा सातारा जिल्ह्यातील कवठे या त्याच्या मूळगावी यायचा. त्यावेळी त्याला सोळेकर तसेच त्यांच्या भावाने दिलेल्या पैशांबाबत तसेच म्हाडातील घराबाबत विचारणा केली. तेव्हा तुमच्या घराचे काम झाले आहे, ते तुम्हाला लवकरच मिळेल, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर, घरासाठी लागणाºया कागदपत्रांची त्यांच्याकडे मागणी केली. ही कागदपत्रेही त्यांनी दिली. मात्र, तरीही त्यांना घर मिळवून दिले नाही आणि पैसेही परत केले नाही.अशाच प्रकारे त्याने रिझर्व्ह बँकेत नोकरीचे आमिष दाखवित संदीप साळेकर, पांडुरंग कंक, जगन पवार, मोहन गोळे, गणेश बेलोशे, मारुती शेळके, स्वप्नील रांजणे आदी १६ जणांची ८९ लाख दोन हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. त्याने आणखीही काही जणांकडून याच पद्धतीने पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सातारा जिल्ह्यातील शिरवळ तसेच नागपूर येथील राणा प्रताप पोलीस ठाणे, अंबड (नाशिक), समतानगर (मुंबई), समर्थ पोलीस ठाणे (पुणे), मावळ (पुणे), नंदुरबार शहर (नंदुरबार), चतु:शृंगी (पुणे) आणि कॅन्टोनमेंट (औरंगाबाद) आदी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील नऊ पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत हा कल्याणमधील खडकपाडा येथे येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे आणि विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, अंकुश भोसले, नितीन ओवळेकर आणि हेमंत महाले यांच्या पथकाने त्याला १७ जानेवारी रोजी दुपारी अटक केली. त्याला आता सातारा येथील शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.* अशी करायचा फसवणूकप्रशांत बडेकर हा फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पुस्तकांमधून लोकांचे फोन नंबर मिळवायचा. त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तसेच मुंबईतील म्हाडा गृहसंकुलामध्ये अल्पदरामध्ये घर घेऊन देतो, असे सांगून फसवणूक करीत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक