शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून फसवले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 06:01 IST

विवाहसंबंध जुळवणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

ठाणे : विवाहसंबंध जुळवणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एका महिलेने विवाहासाठी भारत मेट्रोमोनी डॉट कॉम या संकेतस्थळावर स्वत:चा तपशील दिला होता. या तपशिलाच्या आधारे अमादी क्लेमेंट या नायजेरियन युवकाने दिनेश चेवन या बनावट नावाने महिलेशी संपर्क साधला. हँगआउट अ‍ॅपच्या माध्यमातून त्याने महिलेशी संबंध वाढवून विश्वास संपादन केला. आपण दिल्ली विमानतळावर आल्याचे सांगून जास्त सामान असल्याने कस्टम ड्युटी भरण्यासाठी त्याने महिलेस पैशांची मागणी केली. त्याने दिलेल्या खात्यामध्ये महिलेने १ लाख ५७ हजार ७०० रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर महिलेने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर तपास करून तांत्रिक माहिती गोळा केली. त्याआधारे आरोपीचे वास्तव्य नवी दिल्ली येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक नवी दिल्ली येथे पोहोचले असता आरोपीचे वास्तव्य असलेल्या इमारतीमधील नायजेरियन रहिवाशांनी आत प्रवेश केल्यानंतर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील दोन शिपायांनी बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरून आरोपीच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वाराची चावी मिळवल्यानंतर संपूर्ण पथकाने प्रवेश करून अमादी क्लेमेंट याला अटक केली. आरोपीजवळून नामिबियाचा एक आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन बनावट पासपोर्टसह लॅपटॉप, पाच मोबाइल फोन, मोडेम, तीन सीमकार्ड आणि ६६ हजार रुपये रोख जप्त केल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याच पद्धतीने आरोपीने यापूर्वी आणखी दोन महिलांची फसवणूक केली होती. तीन वर्षांपासून तो भारतात अनधिकृतरीत्या वास्तव्यास असल्याची माहितीही पोलिसांनी या वेळी दिली. पीडितेने आरोपीसोबत एकदाही मोबाइल फोनवर संभाषण केले नव्हते. आरोपीस दीड लाख देण्यापूर्वी तिने थोडीफार खबरदारी घेतली असती, तर तो भारतीय नसल्याचे सहज समजले असते, असे डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले.मेट्रोमोनी वेबसाइटच्या मदतीने गरजू महिलांना हेरून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अशा घटनांमध्ये नायजेरियन युवकांचा सहभाग दिसतो. त्यामुळे अशा प्रकरणांत कुणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी महिलांनी खबरदारी घ्यावी.- डॉ. संदीप भाजीभाकरे,पोलीस उपायुक्त, सायबर सेल

टॅग्स :Crimeगुन्हा