शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रेल्वे स्थानकावर वृद्धाला चावला कुत्रा, रेल्वे प्रवासी संघटना नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:57 IST

सकाळच्या धावपळीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ येथील भटक्या कुत्र्याने ७० वर्षीय शरद शेट्टी यांच्या पायाला चावा घेतल्याची घटना

ठाणे : सकाळच्या धावपळीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ येथील भटक्या कुत्र्याने ७० वर्षीय शरद शेट्टी यांच्या पायाला चावा घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास घडली. दरम्यान, प्रवाशांना अशा प्रकारे कुत्रे चावा घेत असतील, तर स्थानकात भटक्या कुत्र्यांचा वावर तातडीने थांबवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.शेट्टी हे नेहमीप्रमाणे सकाळी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे आले होते. ते लोकलची वाट पाहत असताना, फलाटावर काही कुत्रे मोकाटपणे फिरत होते. त्या वेळी एका कुत्र्याने अचानक त्यांच्या पायाला चावा घेतला. स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून ठाणे जिल्हा (सिव्हिल) रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने या घटनेबाबत नाराजी व्यक्त करून स्थानकात मोकाट फिरणा-या भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढला आहे. आतातरी तातडीने रेल्वे प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा वावर थांबवावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली.

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे