ठाणे : वल्लभ मजेठिया यांनी पोलिसांकडे नोंदविलेली साक्ष बनावट नसून ती खरीच असल्याचा पुनरुच्चार विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी मंगळवारी केला तर २०१७ मधील महापालिकेची निवडणूक सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे यांना लढवायची असून त्यामुळेच त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचा दावा अॅड. हेमंत सावंत यांनी केला.बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तिन्ही नगरसेवकांच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सोमवारी मजेठियांच्या साक्षीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला होता.
राजकीय हेतूने आरोप
By admin | Updated: February 24, 2016 01:20 IST