शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चरस तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून अटक : एक लाखाचा चरस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 21:35 IST

चरस तस्करी करणा-यांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे. मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून समशदअली सय्यद याच्याकडून सुमारे एक लाखांचा चरस हस्तगत करुन त्याला अटक केली.

ठळक मुद्देठाणे पोलिसांची सलग दुस-या दिवशी कारवाईरेल्वे स्थानक परिसरातून घेतले तस्कराला ताब्यातटोळीचा शोध सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चरस या अमली पदार्थाची तस्करी करणा-या समशदअली सय्यद (रा. झाशी) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाखाचा चरस हस्तगत केला असून त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.ठाणे रेल्वेस्थानक परिसरात एक व्यक्ती चरसतस्करीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली खैरनार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक धर्मराज बांगर आदींच्या पथकाने ठाणे रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून सय्यदला ३० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून एक लाखाचा अर्धा किलो चरस जप्त केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सय्यदचे आणखी कोणकोण साथीदार आहेत? त्याने चरस कोणाकडून आणला होता? आदी सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ