शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात अनागोंदी, एका दिवसात ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 06:10 IST

गरोदर महिलेचा समावेश; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे पूर्णत: नियोजन कोलमडून अनागोंदी कारभार दिसून आला. वेळेवर उपचार न मिळाल्याने एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे. दरम्यान, अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटूनदेखील तेथेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, कळवा रुग्णालयाची रुग्ण ॲडमिट करून घेण्याची क्षमता संपली होती. आयसीयूदेखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे तीन रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते, असा खुलासा प्रशासनाने केला आहे. तसेच दुर्दैवाने गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी स्पष्ट केले. यात तीन रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आले होते. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, तर दुसऱ्याचा उलटी झाल्याने मृत्यू झाला. एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका रुग्णाच्या पायाला गळू झाले होते. तसेच एका गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. माळगावकर यांनी यावेळी दिली.

सावळागोंधळाची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. रुग्णालयातील परिस्थिती बघून आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात रुग्णालयाची ही अवस्था असेल तर स्मार्ट सिटी करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी कशासाठी हवी? याच शहरातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र कळव्यात दिलसले. मल्टिस्पेशालिटी, कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात येते. मात्र, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या  रुग्णालयाची गरज  आहे, असे ते म्हणाले.

निधन पावलेल्या रुग्णावर आयसीयूत उपचार?  ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात मृत रुग्णावर उपचार सुरू असल्याचे त्याच्या नातलगांना भासवण्यात आले. दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन जिवंत असणाऱ्या रुग्णांचादेखील जीव धोक्यात टाकण्यात आला, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू होता हे खेदजनक आहे. याबाबत कुणावर कारवाई होईल ही आशा नाहीच, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल