शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या मार्गात लवकरच बदल, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:23 IST

शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या मार्गात लवकरच बदल केले जाणार आहेत.

डोंबिवली  - शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या मार्गात लवकरच बदल केले जाणार आहेत.केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी महापालिका मुख्यालयात शुक्रवारी आपत्कालीन व्यवस्था आणि वाहतूककोंडीबाबत विशेष बैठक घेतली. याप्रसंगी महापालिकेतील अधिकारी, वाहतूक शाखा आणि आरटीओचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी काही बदल सूचवण्यात आले.केडीएमटीच्या डोंबिवलीत १७ बस चालतात. त्यापैकी आठ ते दहा बसच्या मार्गात बदल केले जाणार आहेत. त्यात निवासी विभाग, दावडी आणि ग्रामीण भागातील बस मार्ग आहेत. सध्या डोंबिवली स्थानक परिसरात येणाऱ्या बस बाजीप्रभू चौकातील स्टॅण्ड, इंदिरा गांधी चौक येथे उभ्या केल्या जातात. या बस सुटण्याची वेळ होत नाही, तोपर्यंत त्या तिथेच उभ्या केल्या जातात. शिवाय त्याचठिकाणी भाजी मार्केट, रिक्षास्टॅण्डही आहे. हा परिसर वर्दळीचा असल्याने सकाळ-सायंकाळी येथे नेहमी वाहतूककोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी बोडके यांनी बैठकीत काही बदल सूचविले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.बाजीप्रभू आणि इंदिरा गांधी चौकात यापुढे बस केवळ प्रवासी घेण्यासाठीच थांबतील. या बस विश्रांतीसाठी नेहरू रोडवर थांबतील. निवासी, दावडी आणि ग्रामीण भागातून येणाºया बस टिळक रोडने येऊन नेहरू रोडकडे जाऊन तेथेच थांबतील. त्यांची निर्गमनाची वेळ झाल्यास त्या तेथून निघून चिमणी गल्लीतून पुन्हा बाजीप्रभू आणि इंदिरा गांधी चौकातील थांब्यांवर केवळ प्रवासी घेतील आणि पुढे मार्गस्थ होतील. त्यामुळे बस मार्गाला अडथळा ठरणारे नेहरू रोड आणि चिमणी गल्लीतील फेरीवाले तसेच रिक्षास्टॅण्ड हलविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी प्रभाग अधिकारी आणि वाहतूक शाखेला दिल्या आहेत.अंमलबजावणी होईल?मध्यंतरी पूर्वेला रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या डॉ. राथ रोडवरून केडीएमटी बस चालवली जात होती. फेरीवाला अतिक्रमणावर मात करण्यासाठी हा उपाय शोधून काढण्यात आला होता. परंतु, कालांतराने येथील केडीएमटीच्या फेºया बंद करण्यात आल्या. त्यामुळे आयुक्तांनी सूचवलेल्या बदलांवर प्रभावीपणे अंमलबजावणी होईल का?, याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली