शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण संस्थेच्या (सोसायट्या) करांमध्ये बदल होऊन त्यांना जीएसटी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:46 IST

गृहनिर्माण संस्थेच्या (सोसायट्या) करांमध्ये बदल होऊन त्यांनाही जीएसटी लागू झाला आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांचे मासिक बिल ५००० रूपये किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्या सोसायट्या मेटेनन्सपोटी वर्षाला २० लाख रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची वसुली करतात त्यांना प्रत्येक सभासदांकडून १८ टक्के जीएसटी घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती अ‍ॅड. विशाल लांजेकर यांनी दिली.

ठाणे : गृहनिर्माण संस्थेच्या (सोसायट्या) करांमध्ये बदल होऊन त्यांनाही जीएसटी लागू झाला आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांचे मासिक बिल ५००० रूपये किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्या सोसायट्या मेटेनन्सपोटी वर्षाला २० लाख रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची वसुली करतात त्यांना प्रत्येक सभासदांकडून १८ टक्के जीएसटी घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती अ‍ॅड. विशाल लांजेकर यांनी दिली.विश्वास सामाजिक संस्था आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थच्यावतीने ‘भारतीय संविधानातील ९७ वी घटनादुरूस्ती’ या विषयावर रविवारी गोखले मंगल कार्यालयातील व्याख्यानात ते बोलत होते. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संस्थांशी जोडून सहकार कायद्यातील बदलांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाला ‘विश्वास’चे अध्यक्ष संजय वाघुले होते.गेल्या काही वर्षात लोकांचे शेअर कॅपिटल म्हणजे भांडवल वाढते आहे. त्यादृष्टीने सोसायटीत अधिकाधिक सदस्यांची मेंबरशिप-सदस्यत्व वाढणे गरजेचे आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांचे जे विद्यमान सचिव (सेक्रेटरी) आहेत, त्यांची कामे आणि जबाबदारी येत्या काळात अधिक वाढणार आहे. कारण जे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहत नाहीत, अशा सदस्यांची यादी तयार करून ती दरवर्षी ३१ मार्चनंतर निवडणूक घेणाºया यंत्रणेकडे पाठवावी लागेल. या यादीत अ‍ॅक्टिव्ह आणि नॉनअ‍ॅक्टिव्ह अशी सदस्यांची नावे टाकावी लागतील. ही वर्गवारी ३० एप्रिलपर्यंत करायची आहे. गृहनिर्माण संस्थेची निवडणूक जाहीर झाली, की ही यादी मागवली जाते आणि मग सचिवांची धावपळ सुरू होते. परंतु त्यावर्षीची यादी त्याचवर्षी तयार ठेवावी लागेल, अशी माहिती लांजेकर यांनी दिली. सभासदांच्या संख्येनुसार गृहनिर्माण सोसायट्यांची अ, ब, क, ड अशा चार गटात वर्गवारी केली आहे. अ आणि ब या गटात वाणिज्य संस्था, बँका यांचा समावेश होतो. ज्या सोसायटीचे सभासद २०० पेक्षा अधिक आहेत, त्या सोसायट्या क वर्गात तर २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्या ड वर्गात येतील. निवडणुकीसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील, तर निवडणूक प्रकियेचा कालावधी ३० दिवसांचा असतो.>सभासद संख्येनुसार सोसायट्यांची चार गटांत वर्गवारीगृहनिर्माण संस्थेची निवडणूक जाहीर झाली, की सदस्यांची यादी मागवली जाते आणि मग सचिवांची धावपळ सुरू होते. परंतु त्यावर्षीची यादी त्याचवर्षी तयार ठेवावी लागेल, अशी माहिती लांजेकर यांनी दिली. सभासदांच्या संख्येनुसार गृहनिर्माण सोसायट्यांची अ, ब, क, ड अशा चार गटात वर्गवारी केली आहे.निवडून आलेल्या सदस्यांपैकी कोणी राजीनामा दिला किंवा कोणाचा मृत्यू झाला; तर ती जागा कमिटी आपल्या सोयीने भरू शकते का असा अनेकांचा सवाल असतो. मात्र नवीन घटनादुरूस्तीनंतर त्याचे उत्तर नाही असे आहे.कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टी करताना यापुढे सोसायटीला निवडणूक आॅथोरिटीकडे जावे लागेल, असे लांजेकर यांनी स्पष्ट केले. याचवेळी कॅश इन हँड (किती रोकड बाळगायची) आणि कॅश एक्सपेन्सेस लिमिटबाबतही (खर्चाची मर्यादा) त्यांनी मार्गदर्शन केले.व्याख्यानाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.