शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचा वचपा भिवंडीत; काँग्रेसचा ‘दे धक्का’ : उपमहापौरपदाच्या उमेदवारासह भाजपचे ६ नगरसेवक फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 05:23 IST

भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौर, उपमहापौरपदी तारिक मोमीन

भिवंडी : भाजपमधून फुटून बाहेर पडलेल्या सहा नगरसेवकांच्या गटाचे नेते व काँग्रेसप्रणीत सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी यांनी ४८ मते मिळवित शुक्रवारी महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला. उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन ४३ मते मिळवून विजयी झाले. त्यामुळे भिवंडीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या स्नेहा पाटील यांना केवळ १६ मते मिळाली.

सेक्युलर फ्रंट, भाजप व शिंदेसेना अशी तिरंगी लढत झाली. शिंदेसेनेचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. कोणार्क विकास आघाडीचे ४ नगरसेवक निवडून आले. त्यांचे प्रमुख विलास पाटील महापौरपदासाठी उत्सुक होते. त्यांना शिंदेसेनेचाही पाठिंबा होता. याच काळात विलास पाटील यांना जमीन व्यवहार आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक झाली. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. पाटील महापौर होऊ नयेत असे भाजपचे स्पष्ट मत होते. विलास पाटील यांना शिंदेसेनेच्या १२, कोणार्क विकास आघाडीच्या ४, भिवंडी विकास आघाडीच्या ३ आणि समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांनी मतदान केले.

पक्षीय बलाबल

काँग्रेस : ३०

राष्ट्रवादी (शरद पवार)    : १२

समाजवादी      : ६

भाजप : २२

शिंदेसेना       : १२

कोणार्क विकास आघाडी   : ४

भिवंडी विकास आघाडी    : ३

अपक्ष   : १

...अन् गणितेच बदलली

महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडल्याने काँग्रेस प्रणीत सेक्युलर फ्रंटचा महापौर झाला. विशेष म्हणजे भाजपने महापौरपदाचे बदललेले उमेदवार नारायण चौधरी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार सुहास नकाते फुटल्याने निवडणुकीची गणितेच बदलून गेली. मनपा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मनपा मुख्यालयासमोर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपवाले लोकांना एक-दुसऱ्यापासून तोडणारे आहेत. आम्ही एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा सेक्युलर विचारधारेचा व भिवंडीतील सर्व जनतेचा विजय आहे. शहर

विकासासाठीच नारायण चौधरी सेक्युलर फ्रंटसोबत आले.

खा. सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादी (शरद पवार)

नारायण चौधरी भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौर आहेत. आतापर्यंत काँग्रेस, समाजवादी पक्ष भाजपकडून फोडण्यात येत होते. मात्र, पहिल्यांदाच भाजपमध्ये फूट पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांचा सेक्युलर फ्रंटला पाठिंबा आहे.

आ. रईस शेख, सपा

मी आज कोणत्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही. मी शहराच्या विकासासाठीच सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झालो आहे. आजपासून मी केवळ विकासाच्या मुद्द्यांवरच बोलणार व शहराचा विकास करणार.

नारायण चौधरी, निर्वाचित महापौर

शहराचा विकास करणे हेच आमचे प्रथम प्राधान्य व ध्येय असणार आहे. भिवंडीतील जनतेने मला निवडून दिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो.

तारिक मोमीन, नवनिर्वाचित उपमहापौर

काेणाला पडली किती मते? : भाजपने तीन दिवसांपूर्वी स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर चौधरी यांना सेक्युलर फ्रंटकडून उमेदवारी देण्यात आली. तसा व्हिप काँग्रेसने काढला होता. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तारिक मोमीन विजयी झाले.  माेमीन यांना ४३, भाजपचे सुहास नकाते यांना २१, शिंदेसेनेचे जावेद दळवी यांना २५ मते मिळाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur's Revenge in Bhiwandi: Congress Wins, BJP Suffers Defections

Web Summary : In Bhiwandi, Congress's Secular Front secured mayoral victory as BJP faced defections. Narayan Choudhary became mayor, Tariq Momin deputy mayor. Internal strife and strategic alliances led to a significant shift in local politics, impacting BJP's hold.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६