शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मदतीत वाढ विचाराधीन - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 04:26 IST

शेतावर काम करणाऱ्यांना रोजगार हमीची साथ

डोंबिवली : शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. त्यातून बाहेर काढून त्याला बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पैसा हवा. त्यासाठी मोदी सरकारकडून शेतकºयांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. पुढील काळात सरकारकडून ही रक्कम वाढवली जाणार असल्याची माहिती महसूल, कृषी, फलोद्यान, मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.

डोंबिवली मध्यवर्ती सहकारी भांडार संस्थेच्या अमृतोत्सव कार्यक्रमप्रसंगी पाटील बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, मध्यवर्ती भांडार संस्थेचे अध्यक्ष प्रसाद गोगटे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, मनसे नगरसेवक मंदार हळबे, भाजप नगरसेवक राहुल दामले, संदीप पुराणिक, मनीषा धात्रक, सुनीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, शेतकरी २५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी बँकेतून कर्ज काढतो. ते फेडण्यापूर्वीच दुष्काळ पडतो. त्यामुळे आधीचे कर्ज फेडलेले नसल्याने बँकेकडून दुसरे कर्ज नाकारले जाते. शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतो. कर्जाच्या बोजाखाली दबतो. यातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये शेतकºयांच्या खात्यात थेट जमा केले जातात, ज्यातून तो बी-बियाणे खरेदी करू शकतो. शेतावर काम करणाºया शेतकºयालाही रोजगार हमीतून पगार दिला जावा, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे पाटील म्हणाले.

सरकारला व्हॅटमधून ८७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. जीएसटीमुळे सरकारला एक लाख १७ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. जीएसटीमुळे सरकारचे उत्पन्न ३३ हजार कोटींनी वाढले. घरखरेदीवरील मुद्रांक शुल्काच्या करातून सरकारला गतवर्षी २१ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी २९ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यात आठ हजार कोटी रुपयांनी वाढ झाली. याच उत्पन्नातून सरकार दुष्काळी उपाययोजनांसह मदत व पुनर्वसनाचे काम करते. राज्याचा दुष्काळ फेडण्यासाठी जेमतेम आठ ते दहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकारचा आर्थिक ‘साइज’ वाढला आहे. तसेच लोकांचाही आर्थिक ‘साइज’ वाढल्याचीमाहिती चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिली.

‘मध्यवर्ती भांडारांची स्थिती वाईट’रिझर्व्ह बँकेचे संचालक मराठे यांनी सांगितले की, राज्यात व देशभरात सहकारी तत्त्वावर चालणाºया मध्यवर्ती भांडारांची स्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत डोंबिवलीतील मध्यवर्ती सहकार भांडार ७५ वर्षे चालते, ही उल्लेखनीय बाब आहे. मध्यवर्ती सहकारी तत्त्वावर चालणाºया संस्थांना जीएसटीची मर्यादा ४० लाखांपर्यंत आहे. ही मर्यादा केंद्र सरकारने पाच कोटी रुपयांपर्यंत वाढवावी, असा प्रस्ताव येत्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सरकारकडे मांडला जाणार आहे. त्याचा सरकारने विचार करावा. सहकार तत्त्वावरील कायद्यात बदल होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळाची गरज आहे.