शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरफ्रंट प्रोजेक्टला उच्च न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:17 IST

पर्यावरणाची हानी होण्याची भीती

मुंबई: ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत ठाणे शहरात खाडीकिनारी वॉटरफ्रंट प्रोजेक्टचे काम काही ठिकाणी सुरू झाले आहे. या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने, ठाण्याचे रहिवासी रोहीत जोशी यांनी या प्रकल्पाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.मुंब्रा, खारेगाव, गायमुख, नागलाबंदर, कोपरी, मीठबंदर, साकेत, बाळकुम येथे पहिल्या टप्प्यातील कामाला दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. ठाणे पालिकेने मार्चमध्ये यासंबंधी वर्क आॅर्डर काढली. त्यासाठी खाडीलगतच्या दलदलीच्या जमिनीवर भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होणार असून, भविष्यात ठाण्यात पूर येऊ शकतो, अशी भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे पालिकेने काढलेली वर्क आॅर्डर रद्द करावी व एमसीझेडएमने या प्रकल्पासाठी २०१५ मध्ये दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी, अशी विनंती रोहित जोशी यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकेनुसार, वॉटरफ्रंट प्रोजेक्टअंतर्गत ठाणेकरांना खाडीकिनारी खेळाचे मैदान, जॉगिंग ट्रॅक, गझेबो व अन्य मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी दलदलीच्या जमिनीवर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खाडीकिरनारची जमीन दलदलीची असल्याने, तसेच ती रस्त्याच्या उंचीपासून बरीच खाली असल्याने येथे पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता, येथील जमीन रस्त्याच्या उंचीपर्यंत वाढविण्याचा आत्मघातकी निर्णय महापालिकेने घेतला आहे.> नियम धाब्यावरया प्रकल्पासाठी सीआरझेडच्या नियमांना धाब्यावर बसविण्यात आले आहे, तर खाडीकिनारची जमीन ही महसूल व मेरिटाइम बोर्डाच्या अधिपत्याखाली येते. मात्र, या विभागांशी सल्लामसलत करता व त्यांच्याकडून पूर्वपरवानगी न घेता हा प्रकल्प सुरू केला. कोपरी येथे भराव टाकताना मेरिटाइम बोर्डाने ठामपाच्या कंत्राटदाराला परवानगीशिवाय काम केल्याबद्दल नोटीस बजावली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणे