शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस टिकवून ठेवण्याचेच आव्हान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 02:05 IST

सध्या हा वेळ ते फिटनेसवर खर्च करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे : कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडल्याने खेळाडूंना याचा मोठा फटका बसला आहे. जुलै-आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाºया खेळाडूंचे नुकसान झाले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे सध्या हा वेळ ते फिटनेसवर खर्च करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.कोरोनाच्या साथीमुळे इतर सर्वच क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. क्रीडा क्षेत्राचा संबंध उत्तम आरोग्याशी असला, तरी अद्यापही कोरोनावर लस न सापडल्याने क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाची लागण होण्याची भीती वाटते. सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व असल्याने तातडीने उपाययोजना न केल्यास भावी क्रीडापटूंवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे क्रीडा प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी सुटीमध्ये मुलांसाठी आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेतली जातात. अनेक स्पर्धांचेही आयोजन केले जाते. या साºया स्पर्धा आणि शिबिरे रद्द करावी लागली आहेत. बॅडमिंटन, बॉक्सिंग, स्केटिंग, बास्केटबॉल, खोखो, कबड्डी, क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, टेबलटेनिस, बिलियर्ड्स, अ‍ॅथलेटिक्स, तलवारबाजी अशा विविध खेळांच्या शिबिरांचे आयोजन एप्रिल व मे या महिन्यांत राज्यभरात विविध संस्थांमार्फत होते. या माध्यमातून अनेक उदयोन्मुख खेळाडू प्रशिक्षण घेतात. अनेक नवे खेळाडूही तयार होतात. परंतु, यंदा मात्र तसे काहीही होऊ शकलेले नाही. शिवाय, अनेक अनुभवी, हौशी खेळाडूंचा सरावही लॉकडाऊनमुळे बंद झाला आहे. कामगिरीचा आलेख उंचावत ठेवायचा असेल, तर सराव अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सध्या मैदानावरील सर्व गोष्टी बंद असल्याचा फटका खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. १४, १७, १९ वयोगटांतील खेळाडूंना याचा सर्वाधिक फटका सोसावा लागतो आहे. भविष्यात कधी क्रीडा स्पर्धा होतील, हे आत्ताच सांगता येत नसले, तरी जेव्हा त्या होतील, तेव्हा सराव नसल्याने कामगिरी खालावण्याची भीती खेळाडूंसह प्रशिक्षकांनी व्यक्त केली. मात्र अशा परिस्थितीतही काही क्रीडा संस्था/संघटनांनी इतर पद्धतींनी काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळी शिबिरे घेऊ शकत नसले, तरी त्यांनी आॅनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत खेळांची सखोल माहिती देण्यात येते. विशेषत: त्यांचा भर फिटनेसवर असतो.>जी मुले वर्षभर अभ्यास करतात, ती एप्रिल-मे महिन्यांत शिबिरांत सहभाग घेतात. जुलैपासून सुरू होणाºया स्पर्धा रद्द झाल्या. क्रिकेट हा मैदानावरील खेळ असल्याने त्याचे खूप नुकसान झाले आहे. सध्या मुलांना आॅनलाइन फिटनेसचे प्रशिक्षण दिले जात आहे. - दर्शन भोईर, क्रिकेट प्रशिक्षक>कोरोनामुळे स्पर्धा होत नसल्यामुळे, तसेच खेळाडूंचे नेहमीचे प्रशिक्षण बंद असल्यामुळे स्पर्धात्मक खेळले जाणारे खेळ, खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक या सर्वांवरच मोठी संक्रांत आली आहे. एक प्रशिक्षक म्हणून विचार करता खेळाडूंच्या शारीरिक व त्याहीपेक्षा मानसिक फिटनेसवर जास्त लक्ष द्यावे लागत आहे. जे खेळाडू २०२०-२१ या वर्षात त्यांच्या शेवटच्या स्पर्धात्मक वर्षात होते, त्यांना तर खूप मोठ्या अपेक्षाभंगास सामोरे जावे लागत आहे. अशा खेळाडूंशी दररोज अथवा एक दिवसाआड बोलून, त्यांना अनेक नामवंत खेळाडूंच्या गोष्टी सांगून मानसिक संतुलन राखायचा आम्ही प्रयत्न करतो. - समीर सरळकर, टेबल टेनिस प्रशिक्षक