शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चल रे ए सीएमवाल्या..., भाजपा पदाधिकाऱ्याच्या भावाला दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:27 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून ५०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर त्याची पावती मागणाºया नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना ठाण्यातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून ५०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर त्याची पावती मागणाºया नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना ठाण्यातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेचे चित्रीकरण करणाºया त्याच्या भावजयीच्या हातातील मोबाइल पोलिसांनी हिसकावला, तर घडल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची भाषा राकेशचे बंधू हरीश पांडेय यांनी वापरताच ‘चल रे ए सीएमवाल्या...’ असे उर्मट उत्तर दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.विटावा येथे शुक्र वारी रात्री ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या कळवा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी एका महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. एखाद्या महिला पोलिसाऐवजी स्वत: पोलीस अधिकाºयानेच मोबाइल हिसकावण्याचे ‘कर्तव्य’ बजावल्याने संताप व्यक्त होत आहे.२७ एप्रिल रोजी रात्री नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल विटाव्याजवळ वाहतूक पोलिसांनी अडवून ५०० रुपयांच्या दंडाची आकारणी केली. मात्र, त्याची पावती दिली नाही. यावरूनच हा वाद उद्भवला. त्यावेळी राकेश यांनी नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी हरीश पांडेय या आपल्या भावाला फोनवरून या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत राकेश यांना पोलिसांनी विटावा बीट चौकीत नेले. थोड्याच वेळात हरीश हे त्यांच्या पत्नीसह विटावा चौकीत दाखल झाले. आपल्यावरील कारवाई चुकीची असल्याचा आरोप करून राकेश यांनी ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० क्रमांकावरून दिली. त्यामुळे त्यांना दोन वाहतूक पोलिसांनी आव्हाड यांच्यासमोर हजर केले. हरीश यांनी आपण भाजपा पदाधिकारी असल्याचे सांगितल्यावर तर आव्हाड यांचा पाराच चढला. ‘कोण भाजपा ते मला सांगू नकोस...’ ‘ही तक्रार सीएमकडे करू’, असे जेव्हा पांडेय बोलले तेव्हा ‘चल रे ए सीएमवाल्या...’ अशा भाषेत आव्हाड यांनी त्यांना सुनावले. हेच चित्रिकरण हरीश यांची पत्नी मोबाइलवरुन करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी हरीश पांडेय यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे.- शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणेहरीश व राकेश पांडेय यांनी पोलिसांबरोबर अरेरावी केली. त्यासंदर्भात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबतच्या वृत्तात तथ्य नाही.- मनोहर आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग