शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चल बाला, भरणार ‘आगरी शाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:35 IST

बोलीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न : दहा दिवसांच्या प्रशिक्षणवर्गात उलगडणार भाषेचे पैलूू

ठाणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत आगरी बोली भाषा शिकविणारी ‘आगरी शाला’ भिवंडीजवळ कशेळी गावात भरणार आहे. त्यात दहा दिवसांचे प्रशिक्षणवर्ग होतील. तुम्ही आगरी असा वा नसा किंवा तुम्हाला आगरी येवो किंवा नाही; परंतु आगरी बोली, तिची गोडी, साहित्य जाणण्यासाठी, आगरी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा नवा उपक्रम सुरू झाला आहे.मुंबई, ठाणे, रायगडच्या स्थानिकांची बोली म्हणजे आगरी. अनेकांना या भाषेचे नेमके पैलू माहीत नाहीत. इंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे आगरी बोलीचा वापर कमी होत चालला आहे. ती बोलणाºया वर्गाला भाषेचा विसर पडत आहे. यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रवींद्र तरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वर्ग घेण्याचे ठरविले आहे. तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून साहित्य संमेलनात बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रयोगात काही तज्ज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असेल. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील, आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील, आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील, साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डॉ. अनील रत्नाकर, कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच गीतकार-संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रयोगात सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांना लघु पाठ्यक्रम असलेले पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्याचा समावेश असेल. याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि तरे यांनी केले आहे. या प्रशिक्षणात सर्व वयोगटातील जास्तीत जास्त आगरी भाषाप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन तरे यांनी केले. २ं१५८ं३ं१ी@ॅें्र’.ूङ्मे वर इछुकांनी माहिती पाठवावी. या आगरी प्रयोगानंतर इतरही बोलींमध्ये असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डॉ. रत्नाकर यांनी सांगीतले. ‘आगरी शाला’ या उपक्र माअंतर्गत आगरी भाषेचे अनेक पैलू उलगडणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे