ठाणे : भाजप व विश्वास सामाजिक संस्थेने महिला दिनानिमित्ताने सोमवारी शेकडो चाकरमानी महिलांचा गौरव केला. लोकल प्रवासात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरची बाटली भेट दिली. तर सकाळ प्रफुल्लित होण्यासाठी मोगऱ्याचा गजरा दिला गेला. ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व कु. वृषाली संजय वाघुले यांनी हा कार्यक्रम आयोजिला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करणाऱ्या चाकरमानी महिलांना मास्क, सॅनिटायझरची बाटली आणि मोगऱ्याचा गजरा देण्यात आली. सकाळी नऊपासून दोन तास सुरू असलेल्या या कार्यक्रमात शेकडो महिलांचा सन्मान करण्यात आला. भाजप व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोफत मास्क, सॅनिटायझर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे संजय वाघुले यांनी सांगितले.
चाकरमानी महिलांना मिळाली गजऱ्याबरोबरच मास्क भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST