शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर शहरातील विविध गैरप्रकार व करवाढीविरुद्ध साखळी उपोषण

By धीरज परब | Updated: January 7, 2023 15:27 IST

जिद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील विविध गैरप्रकार व करवाढीविरुद्ध जिद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

पालिकेच्या शाळा दहावी इयत्तापर्यंत सुरू करणे व महाविद्यालय सुरू करावे, आयुक्तांनी नव्याने लावलेला पथकर हा नियमबाह्य असून पूर्वी भाजप सत्तेत असताना दोन वेळा करवाढ केली असल्याने १० टक्के रस्ताकर रद्द करावा, गोल्डन नेस्ट जवळील आरक्षण क्र २१४ हे उद्यानासाठी आरक्षित असताना ३ वर्ष उलटून गेले तरी अद्याप ७११ कन्स्ट्रक्शन कंपनी कडून उद्यानाची जागा मोकळी करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. गोल्डन नेस्ट आराखड्यात दर्शवल्याप्रमाणे अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण करून माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी स्वतःच्या राहत्या  घराचे गार्डन, कार्यालय आदी बेकायदेशीर बांधकामना पालिका संरक्षण देत आहे. सदर बांधकामे हटवून नागरिकां करिता रस्ता मोकळा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नयानगरमधील रॉयल अपार्टमेंट मध्ये आपत्ती वेळेसाठी मोकळ्या ठेवलेल्या जागेत तसेच अन्य बेकायदा बांधकामवर कारवाई  केली जात नाही.

तर जेसलपार्क येथील अग्निशमन केंद्राच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम व कब्जा अजूनही पालिकेने हटवला नाही, आरजी जागेत बांधकामे केली असताना अजून विकासक ओस्तवाल बिल्डर वर कारवाई केलेली नाही. अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे सह संबंधितांवर कारवाई केली जात नाही. शहरात १५० डान्सबार - लोजिंग, पब तसेच टर्फ बनवून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. प्रशासनाकडून हफ्ते घेऊन  संरक्षण दिले जाते. बुद्धविहार हा जनतेसाठी बनवलेला असताना दिवसाचे भाडे २५ हजार आहे आणि इतर सभागृह व वास्तूंचे भाडे पालिकेने वाढवले आहे ते कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमदार गीता जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम,  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , जयराम मेसे , सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता आदींनी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत वा समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार असा इशारा संस्थेचे प्रदीप जंगम यांनी दिला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर