शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला ठरवले कामचलाऊ, श्रीपाद जोशींचा सरकारवर चाबूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:45 IST

आठवीपर्यंत मराठी भाषेची सक्ती पुरेशी असून मराठी वाचण्या लिहिण्यापुरती येणे पुरेसे आहे, हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विधान म्हणजे नफा कमावण्याच्या उद्देशाने इंग्रजी भाषेला वाव देऊन मराठी भाषेला कामचालू समजण्यासारखे आहे

जान्हवी मोर्येडोंबिवली : आठवीपर्यंत मराठी भाषेची सक्ती पुरेशी असून मराठी वाचण्या लिहिण्यापुरती येणे पुरेसे आहे, हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विधान म्हणजे नफा कमावण्याच्या उद्देशाने इंग्रजी भाषेला वाव देऊन मराठी भाषेला कामचालू समजण्यासारखे आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीच अशी भूमिका घेणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली आहे.खाजगी कंपन्यांना इंग्रजी शाळा उघडण्याची परवानगी देणाºया विधेयकाचे समर्थन करताना तावडे यांनी वरील वक्तव्य केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याचा संदर्भ देत जोशी म्हणाले की, सरकारचे मराठीविषयीचे धोरण हे अत्यंत चुकीचे आणि मराठी भाषेवर अन्याय करणारे आहे. मराठी केवळ वाचता, लिहिता येण्यापुरती आली तरी चालेल, असे तावडे यांच्या वक्तव्यातून प्रतीत होत आहे. मराठीऐवजी इंग्रजी ही ज्ञान भाषा जनमानसात प्रस्थापित व्हावी, यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याने सरकारचे धोरण हे इंग्रजीधार्जिणे व मराठीद्वेष्टे आहे. मराठी ही भाषा सर्वाधिक गरजेची भाषा आहे. तिला कामचालू करून इंग्रजीचा पुरस्कार करणे योग्य नाही. इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना अधिकाधिक परवानगी देणे, हे मराठी भाषेला मारक आहे. तसा इशारा भाषातज्ज्ञांनी देणे गरजेचे होते. तसा इशारा त्यांच्याकडून दिला गेला नाही. मराठी ही मराठी भाषकांची विचार करण्याची, अभिव्यक्त होण्याची भाषा आहे. ती कामचालू भाषा नाही. मराठी हा विषय पदवीपर्यंतच्या ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध असणे गरजेचे आहे. जोशी म्हणाले की, इंग्रजी शाळांचा बाजार मांडून त्यातून सरकारला नफा कमवायचा आहे. मराठीची गळचेपी सुरू करायची आहे. मुक्त नफा व मुक्त स्वातंत्र्य देणारे, हे सरकारचे धोरण भारतीय भाषांना ज्ञानभाषा होण्यापासून रोखणारे आहे.मराठीच्या साहित्य उत्सव जागराला व मराठी संवर्धनाचे काम करणाºया संस्थांना मदतीचा हात न देता मराठी विरोधी धोरणात्मक निर्णय घेऊन मराठी संप्वण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीकाही जोशी यांनी केली. सरकारचे मराठीविषयीचे धोरण हे अत्यंत चुकीचे आणि मराठी भाषेवर अन्याय करणारे आहे, असेही ते म्हणाले.