शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एका तासात दिले जातीचे प्रमाणपत्र; समितीला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:43 IST

ठाणे प्रादेशिक जात पडताळणी समितीच्या कारभाराचे वाभाडे काढत उच्च न्यायालयाने आदिवासी विद्यार्थ्याला एका तासात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

मुंबई : ठाणे प्रादेशिक जात पडताळणी समितीच्या कारभाराचे वाभाडे काढत उच्च न्यायालयाने आदिवासी विद्यार्थ्याला एका तासात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, समितीने संध्याकाळी चार वाजता मुलाला न्यायालयातच जात वैधता प्रमाणपत्र देत न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त केली. मात्र, ती न स्वीकारता समितीला हलगर्जीबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिले. कल्याणच्या नारायण गणेश खैरनार याच्या मदतीला उच्च न्यायालय धावून आले. नारायणने अनुसूचित जमातीच्या कोट्यातून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे एमबीएसाठी अर्ज केला. ज्यांनी आरक्षित प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केला आहे, परंतु, जात वैधता प्रमाणपत्र जोडले नाही, अशांना ते आॅनलाइन अपलोड करण्याची मुदत २८ जूनला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होती. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठाकर जमातीच्या नारायणने ठाणे समितीकडे ३१ आॅगस्ट २०१६ ला अर्ज केला होता. पण काल संध्याकाळी त्याचा अर्ज फेटाळला. या निर्णयामुळे त्याला धक्का बसला होता.याच समितीने २००३ मध्ये नारायणचे वडील गणेश व त्याचा काका हेमंत यांना प्रमाणपत्र दिले होते. निराश नारायणने अ‍ॅड. रामचंद्र मेंदाडकर यांच्याशी संपर्क साधला. अ‍ॅड. मेंदाडकर व त्यांचे ज्युनिअर धनाजी यांनी एका रात्रीत याचिकेचा मसुदा तयार केला. आज सकाळी याचिका खंडपीठापुढे नमूद केली. याचिकेतील मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडपीठाने सुनावणी दीड वाजता ठेवली. जात पडताळणी समितीच्या सवयीवर याच खंडपीठाने अनेक वेळा ताशेरे ओढले आहेत. याचीच पुनरावृत्ती नारायणच्या बाबतीत केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला.जात वैधता प्रमाणपत्र न देऊन माझ्यावर एकप्रकारे अन्यायच करण्यात आला. मात्र, मला जलदगतीने न्याय दिल्याने मी न्यायालयाचे आभार मानतो. मला जो आनंद झाला आहे, तो अवर्णनीय आहे. - नारायण खैरनार